कोणी विरंगुळा केद्रासाठी जागा मिळवून देता का हो! ज्येष्ठ नागरिकांची हाक | Virangula Kenrda | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोणी विरंगुळा केद्रासाठी जागा मिळवून देता का हो! ज्येष्ठ नागरिकांची हाक

कोणी विरंगुळा केद्रासाठी जागा मिळवून देता का हो! ज्येष्ठ नागरिकांची हाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंढवा - केशवनगर-मुंढवा येथील अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाने विरंगुळा केद्रासाठी निवासी परिसरात जागा व प्राथमिक सुविधा मिळणे बाबत सन २०१९ पासून नगरसेवक, नगरसेविका, केशवनगर ग्रामपंचायत माजी सदस्य, शिवसेना माजी शहरप्रमुख, आजी-माजी आमदार, महापौर, पुणे मनपा आयुक्त या सर्वांना, त्यांनी वरील सर्वांना सह्यांचे लेखी निवेदनही दिले. परंतु गेल्या तीन वर्षापासून अद्यापही कोणीही त्यांना दाद देत नाही. म्हणून कोणी विरंगुळा केद्रासाठी जागा देता का हो! अशी हाक केशवनगर ज्येष्ठ नागरिक संघाने सर्वांना दिली आहे.

केशवनगर भागात गेल्या चार वर्षापुर्वी अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना झाली. आणि महाराष्ट्र शासन सहाय्यक संस्था निबंधक पुणे विभागाची नोंदणी केलेली आहे. यात हल्ली ३०० जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. या परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. सध्या शहरी भागात जीवन धावपळीचे आणि यंत्रमय झाले आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांकडून ज्येष्ठांचे विचारपूस देखभाल, पोषण, आरोग्य व आवश्यक त्या प्राथमिक सुविधा गरजा याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ज्येष्ठांना सार्वजनिक ठिकाणी, मंदिरात, बस स्टॉप व इतर गैरसोयीच्या ठिकाणी आपला दिवसाचा बराच वेळ घालवावा लागत आहे.

हेही वाचा: ‘सिंबायोसिस’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साहित्य महोत्सवाची मेजवानी

या सर्व अडचणींवर मात करणेसाठी ज्येष्ठांना विश्रांतीसाठी, लोकवस्तीमध्ये विरंगुळा केंद्रासाठी जागा आवश्यक आहे व त्यासोबत शासनाने प्राथमिक सुविधाही देणे गरजेचे आहे. सरकारी दरबारी पत्रव्यवहार करूनही आमची कुणीही दखल घेत नाही. असे अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सखाराम भोसले व सदस्यांनी सांगितले.ज्येष्ठांच्या कल्याणासाठी शासनाने सुरु केलेल्या योजना

‘वृद्धाश्रम’ योजना, मातोश्री वृद्धाश्रम’ योजना, जेष्ठांना ओळखपत्र देणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना (राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना), इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना ज्येष्ठांच्या कल्याणासाठी शासनाने सुरु केलेल्या आहेत. यानुसार केशवनगरमध्ये पालिका काय कर्तव्य बजावते असे संघाचे अध्यक्ष भोसले यांनी सांगितले.

loading image
go to top