विद्यार्थ्यांनो,साॅफ्ट स्कील करा डेव्हलप! झूमद्वारे'व्हर्च्युअल मेंटर्सशिप प्रोग्राम' सुरु

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

विद्यार्थी नोकरीच्या संधी शोधत असताना कोरोना महामारीमुळे लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले.विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. अशा काळात त्यांचा उत्साह वाढिण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे.

पुणे - लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना साॅफ्ट स्कील शिकता याव्यात, प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळावी, करियरला योग्य दिशा मिळावी यासाठी भारत फोर्ज कंपनी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे (सीओईपी) विद्यार्थ्यांसाठी खास 'व्हर्च्युअल मेंटर्सशिप प्रोग्राम' सुरू केला आहे. यामध्ये पुढील चार आठवडे विद्यार्थ्यांना भारत फाेर्ज मधील अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत फोर्जच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी (ता.१९) या मेंटर्सशिप प्रोग्रामचे झूमद्वारे आॅनलाईन उद्घाटन झाले. भारत फोर्जचे कार्यकारी संचालक सुबोध तांदळे, सीओईपी'चे संचालक प्रा. डॉ. बी. बी. आहुजा, भारत फोर्जच्या सीएसआरच्या प्रमुख लीना देशपांडे या वेळी उपस्थित होत्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"उद्याेग आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील दरी कमी होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना नवीन काय ट्रेंड येत आहेत, त्याची महिती मिळणे व त्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे, त्यासाठी अशा मेंटर्सशिप प्रोग्रामची गरज आहे. भारत फाेर्ज आणि सीओईपीने यासाठी पुढाकार घेतल्याने विद्यार्थ्यांना फायदा होईल," असे सुबोध तांदळे यांनी सांगितले. 

जिओशी एअरटेलची टक्कर; नवीन वर्क फ्रॉम होम ऑफर

प्रा. आहुजा म्हणाले, "विद्यार्थ्यांना नवे कौशल्य आत्मसात करता यावे व करियरसाठी योग्य मार्गदर्शन मिळणार असल्याने हा उपक्रम महत्वा आहे. भारत फोर्जने यासाठी सहकार्य केले याबद्दल त्यांचे आभार."

ठाकरेंनी महाआघाडी तोडावी अन्यथा...; भाजप नेत्याने दिला इशारा

या मेंटर्सशिप प्रोग्राममध्ये 'सीओईपी'मध्ये तिसऱ्या व चौथ्या वर्षात शिकणाऱ्या  निवडक विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. पुढील चार आठवडे हा उपक्रम चालणार आहे. विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, साॅफ्ट स्कील याबाबत भारत फाेर्ज मधील अनुभवी अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. हे विद्यार्थी नोकरीच्या संधी शोधत असताना कोरोना महामारीमुळे लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. अशा काळात त्यांचा उत्साह वाढिण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. या  ऑनलाईन उपक्रमात व्हर्चुअल मीटिंग, करिअर मार्गदर्शन सत्र, वेबिनार, संशोधन प्रकल्पांची संधी आणि इंटर्नशिप याचा समावेश आहे. भारत फाेर्ज कडून जे संशोधन सुरू आहे, त्यात आॅनलाईन पद्धतीने सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. लाॅकडाऊन संपल्यावर प्रत्यक्षातही काम करता येणार आहे, असे सीओईपी'तील प्राध्यापक डॉ. अतुल पाटील यांनी सांगितले. यासाठी  सपना गड व सीएसआर टीमचे सदस्य यांची ही मदत असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virtual Mentorship Program launched by Zoom for Students develop soft skills