Pune police file case in dowry harassment matter; married woman alleges physical and mental abuse.
Sakal
पुणे : लग्नाला १७ वर्षे झाल्यानंतरही विवाहितेचा सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विवाहितेने (वय ३८) विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती विजय लक्ष्मण तुपे, तसेच नातेवाईक अलका लक्ष्मण तुपे, लक्ष्मण बबन तुपे, कौस्तुभ लक्ष्मण तुपे (सर्व रा. शनिवार पेठ, पुणे) आणि सागर पांगारे अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.