Vishrantwadi Crime : जबरी चोरी करणारी गुन्हेगार टोळी विश्रांतवाडी पोलिसांनी केली गजाआड

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाने धडक कामगिरी करत जबरी चोरी करणार्‍या गुन्हेगार टोळीला पकडण्यात यश मिळाले आहे.
criminal gang arrested
criminal gang arrestedsakal

विश्रांतवाडी - विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाने धडक कामगिरी करत जबरी चोरी करणार्‍या गुन्हेगार टोळीला पकडण्यात यश मिळाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दि.1 फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यातील फिर्यादी विशाल राजेंद्र नलावडे (वय 22 वर्षे, रा. वृंदावन कॉलनी, मरकळ रोड, आळंदी, पुणे) यांना तीन अनोळखी इसमांनी फेसबुकवर ओळख करून सेक्सकरिता मुलगी देतो, असे सांगून विश्रांतवाडी येथे कस्तुरबा सोसायटीच्या पाठीमागे खदाणीजवळ मोकळ्या जागेत नेले.

तेथे त्यास शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून त्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला व त्याच्या फोनपेवरून एकूण 43,000/-रुपये जबरदस्तीने काढून घेऊन त्याचा मोबाईल घेऊन ते पळून गेले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार तात्काळ अनोळखी आरोपी इसमांचा शोध घेण्यास तपासपथक अधिकारी नितीन राठोड यांनी सहकार्‍यांसह अनोळखी आरोपींचा शोध सुरू केला होता.

तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची माहिती काढून शोध घेऊन आरोपी अमन अजीज शेख (वय-22 वर्षे, रा. आशीर्वाद सोसायटी, साईनाथनगर, वडगाव शेरी, पुणे), मजरजुबेर खान (वय-24 वर्षे, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे), दीपक शांताराम कांबळे (वय-23 वर्ष, रा.- एस.एस. इंग्लीश मिडीअम स्कूलजवळ, जाधवनगर, येरवडा) यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांचेकडे तपास करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल दिल्याने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आज त्यांची येरवडा कारगृहात रवानगी केली आहे.

ही कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ 4 चे पोलीस उपआयुक्त विजयकमार मगर, खडकी विभाग सहा.पोलीस आयुक्त आरती बनसोडे, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पो. निरीक्षक कांचन जाधव, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड, पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार पोलीस हवालदार दीपक चव्हाण, यशवंत किवे, पोलीस अंमलदार संपत भोसले, संजय बादरे, संदीप देवकाते, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे, किशोर भुसारे, अनिल भारमळ, अक्षय चपटे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com