सरकारने मंदिरे उघडली नाहीत तर...; विश्व हिंदू परिषदेचा सरकारला इशारा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

सरकारने मंदिरे त्वरित उघडली नाहीत, तर राज्यभरात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही परिषदेतर्फे यावेळी देण्यात आला.

पुणे : आपण आहात महान, चालू केले मदिरा-पान... चालू दे तुमचे राजकारण, भक्तांना का त्रास विनाकारण... राखू आम्ही सामाजिक भान, उघडा आमचे श्रद्धास्थान... अशा घोषणा देत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मंडई गणपती मंदिरासमोर शंख व ढोल-ताशाचा निनाद करून मंदिरे खुली करावी, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली.

दसरा स्पेशल : छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीची दररोज होणार देखभाल!​

परिषदेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग राऊत, विशेष संपर्क प्रमुख किशोर चव्हाण, मंदिर संपर्क प्रमुख मनोहर ओक, वसंत रणपिसे, सतीश कुलकर्णी, गणेश वनारसे, श्रीकांत चिल्लाळ यांसह कार्यकर्ते सहभागी झाले. सामाजिक अंतर पाळून हे आंदोलन करण्यात आले. मंडई गणपतीसह हडपसर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरही आंदोलन करण्यात आले. सरकारने मंदिरे त्वरित उघडली नाहीत, तर राज्यभरात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही परिषदेतर्फे यावेळी देण्यात आला.

Maratha Reservation: तरुणांनी शरद पवारांना घातले साकडे; 'तमिळनाडू पॅटर्न'कडे वेधले लक्ष्य!​

पांडुरंग राऊत म्हणाले, राज्यातील मंदिरांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या वर्षभराच्या रोजीरोटीची व्यवस्था होत. हे सर्व सध्या ठप्प झाले आहे. भक्तांच्या भावनांचा विचार करावा आणि त्वरित सर्व देवालये खुली करावीत. गेली चार महिने टप्प्याटप्प्याने का होईना सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. सर्व बाजारपेठा, भाजीबाजार, मॉल, सर्व दुकाने, बॅंका, सर्व खासगी सरकारी कार्यालय, कंपन्या, कारखाने सगळेच व्यवस्थित सुरू आहे. हे सगळे सुरू आहे तर मंदिरांवर सरकार रोष का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. किशोर चव्हाण म्हणाले, आर्थिक, मानसिक आणि भावनिकदृश्‍ष्टया अस्थिर झालेल्या माणसाला देवाच्या दर्शनाने अधिक उमेदीने जगण्याचे बळ मिळते. मानसिक आणि भावनिक आधार मिळतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishwa Hindu Parishad agitate in front of Mandai Ganapati demanding opening of temples