पुणे : मंत्री झाल्यानंतर डॉ. विश्वजित कदम म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

-  पुणे काँग्रेस भवनची वास्तू ऐतिहासिक आणि पवित्र

बालेवाडी (पुणे) : पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभारी आहे. पुणे काँग्रेस भवनची वास्तू ऐतिहासिक आणि पवित्र आहे. शेतकऱ्यांशी आणि ग्रामीण भागाशी संबंधित खाते मिळाले आहे. त्यामुळे आता समोर बरीच आव्हाने आहेत. शेतकऱ्यांसमोर संकट अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंत्री झाल्यानंतर प्रथमच शहरात आलेल्या डॉ. विश्‍वजित कदम यांचे रविवारी बालेवाडी येथे स्वागत करण्यात आले. सायंकाळी पाचच्या दरम्यान बालेवाडी जुना जकात नाका या ठिकाणी तसेच भारती विद्यापीठाचे रवींद्रनाथ टागोर स्कूल या ठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी करत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी कॉंग्रेसचे कार्यकर्ते, हितचिंतक हे दुचाकी आणि चारचाकीच्या भव्य रॅलीत सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे झेंडे हातात घेऊन कदम यांच्या नावाचा जयघोष करत परिसर दणाणून टाकला. या रॅलीत एक वाद्य पथकही सहभागी झाले होते. 

पुण्याच्या जावयाला मिळाली गृहमंत्रिपदाची जबाबदारी, पाहा कोण?

त्यानंतर कदम म्हणाले, गेल्या पाच वर्षातील सत्ताधाऱ्यांनी टीका करणे म्हणजे शेतकऱ्यांची कुचेष्टा आहे. दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. मंत्रिमंडळ जुनं-नव्या नेतृत्वाचे आहे. त्यामुळे उत्तम काम होईल. तसेच पश्चिम महाराष्ट्राला आणखी मंत्रिपदे आली असती तर मला आनंद झाला असता, तीन पक्षांचे सरकार असल्याने तडजोडी कराव्या लागल्या, असेही ते म्हणाले.

मुनगंटीवार कोणता गुढीपाडवा म्हणताहेत? 

मुनगंटीवार २०२९ चा की २०३५ चा कोणता गुढीपाडवा सांगत आहेत? गुडीपाडवा सांगताना मुनगंटीवार यांनी सालही सांगायला हवं. भाजपला चांगलं बघवत नाही. तीन पक्ष लोकांच्या हितासाठी एकत्र आले आहेत. त्यांना आता चांगलं बघवत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishwajeet Kadam commented after become MoS in Maharashtra Cabinet