Vishwanath Khaire : खैरेंच्या संशोधनामुळे तमीळ-मराठीचा सेतुबंध स्पष्ट ; बोकील यांचे गौरवोद्गार

‘‘संस्कृतमधून मराठीसह इतर प्राकृत भाषांचा उद्भव झाला, हा समज खोडून काढत ज्येष्ठ भाषा अभ्यासक विश्वनाथ खैरे यांनी तमीळ, मराठी, संस्कृत यांच्यातील सेतुबंध स्पष्ट केला,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक मिलिंद बोकील यांनी खैरे यांच्या कार्याचा गौरव केला.
Vishwanath Khaire
Vishwanath Khairesakal

पुणे : ‘‘संस्कृतमधून मराठीसह इतर प्राकृत भाषांचा उद्भव झाला, हा समज खोडून काढत ज्येष्ठ भाषा अभ्यासक विश्वनाथ खैरे यांनी तमीळ, मराठी, संस्कृत यांच्यातील सेतुबंध स्पष्ट केला,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक मिलिंद बोकील यांनी खैरे यांच्या कार्याचा गौरव केला. खैरे यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त साधना परिवार आणि ग्रंथसखा वाचनालय यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी भाषा वैज्ञानिक मिलिंद मालशे, खैरे यांच्या कन्या प्रज्ञा खैरे-पाटील, मुक्ती खैरे, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ आणि वाचनालयाचे श्याम जोशी उपस्थित होते. बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयामध्ये विश्वनाथ खैरे अध्यासन सुरू करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

बोकील म्हणाले, ‘‘राजनीतीच्या दृष्टिकोनातून संस्कृतकडे पाहण्याची घातक वृत्ती वाढत आहे. भाषांचे मूळ शोधताना मानवकेंद्री विचार अधोरेखित होतो, हे खैरे यांच्या संशोधनातून दिसून येते.’’ मालशे म्हणाले, ‘‘संस्कृत आणि प्राकृत एकाचवेळी अस्तित्वात होत्या. या भाषांसंदर्भात आपणच श्रेष्ठ-कनिष्ठ या संकल्पना जोडल्या. खैरे यांच्या ‘संमत’ (संस्कृत, मराठी, तमीळ) पुस्तकाच्या आधारे लोकभाषा, लोकसाहित्य, लोकसंस्कृतीचा अभ्यास करून युवा अभ्यासकांनी नवा सिद्धांत मांडून पूर्ण अंधारातून कवडसे शोधण्याची आवश्यकता आहे.’’

Vishwanath Khaire
Pune Crime News : बाणेर परिसरात घरफोड्या करणाऱ्या आरोपींना अटक

खैरे म्हणाले, ‘‘भाषा शिकण्यासाठी विद्यापीठांमध्ये जाण्याची गरज नाही. सामान्य माणूस आपल्या पातळीवर भाषा जतनाचे काम करू शकतो. आभासी अध्यासनामध्ये सर्व शाखांचा मिळून अभ्यास व्हावा आणि समाजाला एकत्र आणणारे संशोधन पुढे न्यावे. नवभारत आणि साधना यांनी माझे लेखन प्रसिद्ध केले.’’ प्रज्ञा खैरे-पाटील आणि मुक्ती खैरे यांनी मनोगत व्यक्त केले. विवेक सावंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुहास पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकून उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांनीच मराठीचा त्याग केला आहे. पण भाषा सर्वसामान्यांची असते आणि तेच भाषा जतन करण्याचे काम करतात.

- मिलिंद बोकील, लेखक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com