अभिवादनातून एकीचा संदेश द्या - नांगरे पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

वाघोली - जातीय तेढ निर्माण होईल असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर टाकू नका. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सहकार्य करून एकजुटीचा संदेश द्या, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले. 

वाघोली येथे लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस पाटील, सरपंच, पदाधिकारी, नागरिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी नांगरे पाटील बोलत होते. 

ते म्हणाले, ‘‘कारेगाव भीमा येथे येणारा प्रत्येक जण शांततेत विजयस्तंभाला अभिवादन करेल. यासाठी एकजूट गरजेची आहे. एकजुटीचा हा संदेशच मागील वर्षी घडलेल्या प्रकाराचा डाग पुसून टाकेल. गैरप्रकार करणाऱ्यांची प्रशासनाकडून गय केली जाणार नाही.’’ 

या प्रसंगी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप जाधव, संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर आदी उपस्थित होते.

विजयस्‍तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काेरेगाव भीमा येथील कायदा व सुव्‍यवस्था अबाधित राहण्यासाठी या वर्षी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. तसेच नागरिकांचेही सहकार्य महत्त्वाचे आहे.
- विश्वास नांगरे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक

Web Title: Vishwas Nangare Patil Talking