
Renowned author Vishwas Patil elected President of Marathi Sahitya Sammelan 2025 in Satara.
Sakal
पुणे: सातारा येथे होणाऱ्या ‘९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे एक ते चार जानेवारी या कालावधीत हे संमेलन होणार आहे.