

From Darkness to Light: Eye Donation Ends Six Decades of Blindness
esakal
-रवींद्र पाटे
नारायणगाव: बालपणापासूनच डाव्या डोळ्याला अंधत्व आलेल्या ओतूर येथील वंदना खंडू डुंबरे( वय-६३ ) या ज्येष्ठ महिलेच्या डोळ्याची नेत्ररोपण शस्त्रक्रिया येथील पद्मश्री डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल रुग्णालयात करण्यात आली. नेत्ररोपणामुळे मागील सुमारे साठ वर्षाचे अंधत्व दूर झाल्याने वंदना डुंबरे यांनी रुग्णालय प्रशासनाचे व मरणोतर नेत्रदान करणाऱ्या युवकाचे आभार मानले आहेत.