योजनांची माहिती असलेल्या पुस्तकांचा संच अहिरे ग्रामपंचायतीला भेट

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 2 मे 2018

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा खाडेवाडी, मोकरवाडी व अहिरेगाव ग्रामपंचायत येथे अहिरेगावचे सरपंच युवराज वांजळे यांच्या ध्वजारोहण करण्यात आले.

कोंढवे धावडे : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा खाडेवाडी, मोकरवाडी व अहिरेगाव ग्रामपंचायत येथे अहिरेगावचे सरपंच युवराज वांजळे यांच्या ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी योजनांची माहिती असलेल्या पुस्तकांचा संच ग्रामपंचायतीला भेट देण्यात आला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश बापु कोंडे यांच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेले आधारकाठी या दहा पुस्तकांचा संच ग्रामपंचायतीला भेट देण्यात आला.  

अहिरेगावचे सरपंच युवराज वांजळे, मुख्याध्यापक प्रकाश घोळले व राजाराम लडकत याना ग्रामपंचायत सदस्या साधना समिर शिर्के यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ग्रामसेवक एस. डी. नाईकवडी, नारायण मोकर, ज्ञानोबा शिर्के, सिताराम मोकर, माऊली मोकर, शकर खाडे, गणपत नालगुडे, सदाशिव खाडे, महेश बाळगे, पुनम पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना विभागप्रमुख सागर शिर्के यानी केले.

Web Title: Visit to Ahire Gram Panchayat a set of books on schemes