Narayangaon News : तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ तमाशा कलावंत हिराबाई कांबळे व अशोक पेठकर यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर.
hirabai kamble and ashok pethkar
hirabai kamble and ashok pethkarsakal

नारायणगाव - राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती हिराबाई कांबळे (सन २०२१) व अशोक पेठकर (सन २०२२) यांना जाहीर केला आहे.

पाच लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून मार्च महिन्यात मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार निवड समितीचे माजी सदस्य खंडूराज गायकवाड यांनी दिली.

पुरस्कारार्थींचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे. विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 15 जानेवारी 2024 रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

या बाबत खंडूराज गायकवाड म्हणाले राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन 2006 पासून तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणा-या ज्येष्ठ कलावंतास तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

राज्य शासनाने तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवन गौरव पुरस्काराचे पुरस्कार्थी निवडण्यासाठी निवड समिती गठीत केली आहे. या समितीने सन २०२१ च्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ तमाशा कलावंत हिराबाई कांबळे यांची तर सन २०२२ च्या पुरस्कारासाठी अशोक पेठकर यांची निवड केली आहे.

अशोक पेठकर( ज्येष्ठ तमाशा कलावंत) -

अशोक पेठकर यांनी 1972 साली प्रथम दादू अवसरीकर सह निवृत्ती पोंदेवाडीकर यांच्या तमाशातील दख्खनचा मर्द मराठा अर्थात सेनापती संताजी घोरपडे या वगनाट्यात सेनापती संताजी घोरपडे यांची प्रमुख भूमिका साकारली. त्यानंतर तमाशा क्षेत्रात ते प्रकाश झोतात आले. त्यांनी फड मालक विठाबाई नारायणगावकर, भिका भीमा सांगवीकर, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे यांच्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक वगनाट्यात मुख्य भूमिका साकारल्या.

हिराबाई कांबळे (ज्येष्ठ तमाशा कलावंत) -

हिराबाई कांबळे यांनी १९६० ते १९९२ दरम्यान जयवंत सावळजकर सह शामराव पाचेगांवकर यांच्या तमाशात पारंपारीक गायीका,नृत्यांगणा म्हणून काम केले. अनेक गाजलेल्या वगनाट्यात त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. पारंपारीक तमाशा कला जीवंत रहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राजा हरीचंद्र, चंद्रकेतु मुबारक, चंद्रमोहन, लाला पठाण, पाथर्डीचे राजे, कहाणी सत्यवतीची पुनर्जन्माची महती आदि वगनाट्यातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com