तब्बल 25 निवडणुकांत पहिल्यांदा मतदान करणारा पुण्यातील अवलिया 

vitthal mehta from Pune was voting for the first Time in Last 25 elections
vitthal mehta from Pune was voting for the first Time in Last 25 elections

पुणे : निवडणूक पदवीधर मतदारसंघाची असो अथवा महापालिका, विधानसभा अन लोकसभेची... मतदान सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास केंद्रावर पोचून मतदान करणाऱया अवलियाची ही गोष्ट. मंगळवारी 25 व्यांदा त्यांनी पहिल्यांदा मतदान करण्याची किमया साधली. 

विठ्ठल मेहता, हे या अवलियाचे नाव. पुण्यातील खडकमाळ आळीतील घोरपडे शाळेतील मतदान केंद्रात त्यांनी सलग 40 वर्षे 25 निवडणुकांत त्यांनी पहिल्यांदा मतदान केले आहे. पहिले मतदान आपले असले पाहिजे, या जिद्दीने ते मतदानाच्या दिवशी कार्यरत असतात. मतदानाच्या दिवशीही एरवीप्रमाणे ते पहाटे पाच वाजता उठतात. व्यायाम करून सकाळी साडेसात वाजताच मतदान केंद्र गाठतात. त्यामुळे मतदानाला सकाळी आठ वाजता सुरवात झाल्यावर आपसूकच त्यांचा पहिला क्रमांक लागतो. मेहता यांचा हा शिरस्ता परिसरातील सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना माहिती झाला आहे अन त्यांच्या चर्चेचा विषय अनेकदा ठरतो.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा/

मेहता यांचे सध्या वय 63 वर्षे आहे. वयाच्या 21 व्या वर्षांपासून ते मतदानाचा हक्क बजावतात. सुमारे 40 वर्षांपू्र्वी त्यांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला तेव्हाही नवलाई म्हणून भल्या सकाळीच मतदान केंद्रावर ते पोचले होते. तेव्हापासून ती परंपरा त्यांनी जपली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकासाठी मंगळवारीही सकाळी घोरपडे पेठ शाळा मतदान केंद्रावर त्यांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. या बाबत सकाळी संवाद साधताना ते म्हणाले, निवडणुकीतील मतदान हा आपला हक्क आहे. प्रत्येकाने तो बजावलाच पाहिजे. त्यासाठीच मला पहिल्यांदा मतदान करावे असे वाटते. म्हणून मी लवकरच मतदान केंद्रावर जातो. तेथील अधिकारी, कर्मचाऱयांनाही या बाबतची माझी भूमिका सांगतो. त्यामुळे त्यांचेही मला सहकार्य मिळते. 

मेहता हे कॉंग्रेसचे घोरपडे पेठेतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. उमेदवार कोणताही असो, मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे, अशी त्यांची भूमिका असते. मतदानाचा हक्क बजावल्यावर ते मतदारांच्या घरांपर्यंत जातात आणि त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात. महापालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणुकांतही त्यांचा हा शिरस्ता कायम असतो. मेहता यांचा ड्रायव्हिंग स्कूलचा व्यवसाय आहे. त्या माध्यमातूनही ते मतदानाच्या हक्काबद्दल नागरिकांत जागरूकता निर्माण करतात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com