esakal | व्होडाफोन-आयडीया (व्हीआय) ची सेवा ठप्प असल्याने अनेकांना मनस्ताप
sakal

बोलून बातमी शोधा

VI-Logo

गेल्या 30 तासांपासून व्हीआय (व्होडाफोन-आयडीया) ची सेवा ठप्प असल्याने अनेकांना मनस्ताप व अडचणींना तोंड द्यावे लागले. अनेकांच्या कामावरही थेट मोबाईल सेवा खंडीत झाल्याचा परिणाम झाला. ज्यांच्याकडे फक्त एकच व्हीआय कंपनीचे सीमकार्ड होते त्यांना सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागला.

व्होडाफोन-आयडीया (व्हीआय) ची सेवा ठप्प असल्याने अनेकांना मनस्ताप

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती - गेल्या 30 तासांपासून व्हीआय (व्होडाफोन-आयडीया) ची सेवा ठप्प असल्याने अनेकांना मनस्ताप व अडचणींना तोंड द्यावे लागले. अनेकांच्या कामावरही थेट मोबाईल सेवा खंडीत झाल्याचा परिणाम झाला. ज्यांच्याकडे फक्त एकच व्हीआय कंपनीचे सीमकार्ड होते त्यांना सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुधवारी (ता. 14) रात्रीपासूनच व्हीआयची सेवा ठप्प झाली होती, मात्र काही काळात ही सेवा पूर्ववत होईल या अपेक्षेने अनेकांनी प्रारंभी त्या कडे दुर्लक्ष केले, मात्र कालची सकाळ उजाडली, पाठोपाठ दुपार झाली, संध्याकाळपर्यंत ही सेवा खंडीतच राहिली होती. रात्रभरही नेटवर्क नसल्याने व सर्वात महत्वाचे म्हणजे कनेक्टिव्हीटी नसल्याने फोनही लागत नव्हते. अनेकांना एकमेकांशी संपर्क साधणेच अशक्य होऊन बसले होते. 

सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ज्यांच्याकडे लँडलाईनचे दूरध्वनी आहेत त्यांनी काल प्रथमच त्याचा वापर केला. ज्यांच्याकडे दुस-या कंपन्यांची सीम कार्ड होती त्यांची सेवा सुरु होती, मात्र अनेकांचे मोबाईल व्हीआयचे असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे अशक्य बनून गेले होते. नेटवर्क कधी सुरु होणार याची चौकशी कोठे करायची कोणाशी संपर्क साधायचा याची काही माहिती नसल्याने अनेकजण हवालदिल झाले होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडेही अनेकांनी चौकशी केली, पण नेमके उत्तर काही मिळत नव्हते. शहरातील बहुसंख्य व्हीआय स्टोअर्स बंद होती, दुकानदारांचे फोनही बंद होते, त्या मुळे ग्राहकांना अधिकच मनस्ताप झाला. 

Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

काही जणांनी वैतागून दुस-या कंपन्यांची सीमकार्डही काल खरेदी केली. आज सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत व्हीआयचे नेटवर्क सुरु झालेले नव्हते. नेटवर्क बंद राहण्यामागे प्रचंड पाऊस हे कारण असणार याची जाणीव सर्व ग्राहकांना होतीच, मात्र ही सेवा सुरळीत राहण्यास किती कालावधी लागेल याची कल्पना कंपनीने ग्राहकांना सोशल मिडीयावरुन तरी द्यायला हवी होती, अशी ग्राहकांची भावना होती. 

Edited By - Prashant Patil