मतमोजणीसाठी 14 ठिकाणे निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी (ता. 21) मतदान झाल्यानंतर गुरुवारी (ता. 23) मतमोजणी होणार असून, त्याकरिता विविध भागांत 14 ठिकाणे निश्‍चित केली आहेत. त्यात गणेश कला क्रीडा रंगमंचासह बालेवाडी मैदान, बाणेरमधील पुरंदर बहुउद्देशीय केंद्र, पौड रस्त्यावरील "एमआयटी' शाळा, कोरेगाव पार्कमधील अन्नधान्य महामंडळाचे गोदाम या ठिकाणांचा समावेश आहे. 

गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात होणार आहे. त्याची प्रशासकीय तयारी महापालिकेच्या निवडणूक विभागाने केली आहे, असे महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. 

मतमोजणीची ठिकाणे, प्रभाग पुढीलप्रमाणे ः 
क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक, मतमोजणीचे ठिकाण 
औंध क्षेत्रीय कार्यालय 8,9 पुरंदर बहुउद्देशीय केंद्र (बाणेर) 
घोले रस्ता 7,14,16 बालेवाडी मैदान 
कोथरूड 10,11,12 एमआयटी शाळा, 
वारजे-कर्वेनगर 13,31,32 पं. दीनदयाळ उपाध्याय विद्या मंदिर (पौड रस्ता) 
येरवडा 1, 2,6 अन्नधान्य महामंडळ गोदाम 
नगर रस्ता-वडगावशेरी 3,4,5 कै. भिकू राजाराम पठारे प्राथमिक शाळा (खराडी) 
भवानी पेठ 18,19,20 अबुल कलाम सभागृह, कोरेगाव पार्क 
कसबा-विश्रामबाग 15,17,29 न्यू इंग्लिश स्कूल 
टिळक रस्ता 30,33,34 सर परशुरामभाऊ विद्यालय 
सहकारनगर 28,35,36 गणेश कला क्रीडा मंच 
बिबवेवाडी 27,37,41 बाबूराव सणस मैदान 
धनकवडी 38,39,40 धनकवडी महापालिका सहायक आयुक्त कार्यालय 
हडपसर 21,22,23 साधना विद्यालय हडपसर 
कोंढवा-वानवडी 24,25,26 सावित्रीबाई शिवरकर बहुउद्देशीय सभागृह

Web Title: Vote counting for 14 specific places