#IWillVote आम्ही आहोत लोकशाहीचे पाईक!

I-WIll-Vote
I-WIll-Vote

पुणे - लोकशाहीचे भवितव्य आणि पाइक आम्ही आहोत.  निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असेल, तर त्यापासून आम्ही दूर राहणार नाही. केवळ आम्ही स्वत:च नाही, तर आमचे पालक आणि मित्रांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करू, असा निश्‍चय एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला.

‘सकाळ’च्या ‘आय विल व्होट’ या उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक रमेश डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, प्रशासन अधिकारी अभिजित पवार या वेळी उपस्थित होते.

मोनिका सिंह म्हणाल्या, ‘‘मतदान हा तुमचा हक्क आहे; पण त्याबरोबरच तुमचे पालक, मित्र यांनादेखील मतदानासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.’’

हेमंत मणियार (सचिव, पूना गुजराती केवळणी मंडळ) : मतदान हे सर्व नागरिकांचे राष्ट्रीय व निस्वार्थ कर्तव्य आहे. प्रलोभनास बळी न पडता योग्य त्या उमेदवारास मतदान करून आपला हक्क बजवावा.

डॉ. गिरीश पठाडे : देशात सदृढ लोकशाही आणि स्थिर सरकार हेच प्रगतीचे द्योतक असते. त्यासाठी सर्वांनी मतदान करणे आवश्‍यक आहे. 

अभिजित पवार : भारत हा जगामध्ये सर्वांत तरुण देश आहे. सर्व तरुण व तरुणींनी मतदाराचा हक्क बजावून देशाला योग्य व जबाबदार सरकार निवडून द्यावे.

प्रियांका साळुंखे : मी प्रत्येक वेळी मतदान करते. युवा पिढीने मतदान केलेच पाहिजे. 

तेजल ताकवले : महिला सक्षमीकरणास प्राध्यान दिले पाहिजे. त्यासाठी महिलांनी पुढे येऊन मतदानाचा अधिकार बजवावा. 

जय चंद्रात्रे : देशाच्या विकासाबाबत आपल्या काही कल्पना असतील, तर त्याला मतदानातूनच चालना देता येते. 

मल्हार जाधव : एक मत आपल्या देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकते. देशाच्या प्रगतीसाठी हा हक्क आपण बजावला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com