Pune News: वाघोलीला जाऊन मतदान करू नका, अन्यथा रडूस्तर चोप मिळेल; बॅनरबाजीद्वारे दुबार मतदान टाळण्याचे आवाहन!

Voter intimidation issue During local Body Elections: दुबार मतदान रोखण्यासाठी वाघोलीला न जाण्याचा इशारा; ग्रामस्थांमध्ये संभ्रम
Banner displayed in the area warning against duplicate voting ahead of the elections.

Banner displayed in the area warning against duplicate voting ahead of the elections.

eSakal

Updated on

-प्रमोल कुसेकर

मांडवगण फराटा : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतदान प्रक्रिया सुरू असताना शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात एकच खळबळ उडाली आहे. मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, वडगाव रासाई, इनामगाव, निर्वी, बाभुळसर बुद्रुक, पिंपळसुटी,तांदळी आदी गावांतील अनेक ग्रामस्थांची नावे पुणे महानगरपालिकेच्या मतदारयादीत आढळून आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व अस्वस्थता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर मांडवगण फराटा व परिसरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीच्या वतीने फ्लेक्स लावून दुबार मतदान केल्यास किंवा त्यासाठी वाघोली येथे गेल्यास “रडूस्तर चोप देऊन पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा थेट आणि सज्जड इशारा देण्यात आला आहे.या बॅनरबाजीमुळे संपूर्ण गावासह आसपासच्या परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com