मतदार पडताळणी कार्यक्रम वेळेत पूर्ण करावा; जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

  • मतदार पडताळणी कार्यक्रम वेळेत पूर्ण करावा 
  • मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 

पुणे: पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करुन मतदार पडताळणी कार्यक्रम निर्धारित वेळेत पूर्ण करावा, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात गेल्या 11 नोव्हेंबरपासून मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू आहे. यासंदर्भात आढावा घेण्यासाठी बलदेव सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली.

कोरोनाला घाबरू नका; अशा प्रकारे घ्या काळजी

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूरचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, दौलत देसाई, डॉ. अभिजित चौधरी, मिलिंद शंभरकर, साताऱ्याचे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voter verification program should be completed in time says Baldev singh