#VoteTrendLive मावळात कमळ फुलणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुणे - जिल्हा परिषद आणि मावळ पंचायत समितीच्या निवडणुकीत मावळ तालुक्‍यात दुपारी एक वाजेपर्यंतच्या अंदाजानुसार भाजपने आघाडी घेतली असून, पंचायत समितीच्या चाव्या पुन्हा एकदा भाजपच्याच ताब्यात राहणार असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या पाचपैकी दोन जागांवर भाजपने निर्णायक आघाडी घेतली असून, अन्य ठिकाणी राष्ट्रवादी- भाजप यांच्यात चुरस आहे. वडगाव- खडकाळा जिल्हा परिषद गटात अपक्ष उमेदवार बाबूराव वायकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

मावळात इंदोरी- सोमाटणे जिल्हा परिषद गटात नितीन मराठे यांनी पंधराव्या फेरीअखेर निर्णायक आघाडी घेतली आहे, तर इंदोरी गणात भाजपच्या ज्योती शिंदे आणि सोमाटणे गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे साहेबराव कारके यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. चांदखेड- महागाव जिल्हा परिषद गटात भाजपचा पुन्हा एकदा प्रभाव राहिला आहे. भाजपच्या अलका धानिवले, तसेच पंचायत समितीच्या चांदखेड गणातून निकिता घोटकुले, तर महागाव गणातून जिजाबाई पोटफोडे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 

तालुक्‍याचे लक्ष लागलेल्या वडगाव- खडकाळा जिल्हा परिषद गटात अपक्ष उमेदवार बाबूराव वायकर यांनी पहिल्यापासूनच आघाडी घेतली. त्यांची भाजपचे रामनाथ वारिंगे आणि राष्ट्रवादीचे सुनील ढोरे यांच्यात चुरस आहे. तसेच, वडगाव आणि खडकाळा गणात भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस सुरू आहे. टाकवे- वडेश्‍वर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या गटात या वेळी भाजपने चुरस निर्माण केली आहे. या दोन्ही गटांमध्ये कधी भाजपचे, तर कधी राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर जात आहेत, त्यामुळे चुरस कायम राहील, असे सध्याचे चित्र आहे. एकंदरीतच भाजपने जिल्हा परिषद गटात दोन जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. तर, पंचायत समिती पुन्हा एकदा भाजपच्याच ताब्यात राहणार हे निश्‍चित झाले आहे. एकंदरीतच भाजपने जिल्हा परिषद गटात तीन जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे, तर पंचायत समिती पुन्हा एकदा भाजपच्याच ताब्यात राहणार हे निश्‍चित झाले आहे. 

Web Title: #VoteTrendLive bjp in maval