भाजपच्या झोळीत पावणेतीन लाख मते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीमधील पक्षनिहाय मतदानाची आकडेवारी निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. त्यामध्ये, बहुमतप्राप्त ‘भाजप’च्या झोळीत मतदारांनी सर्वाधिक म्हणजे पावणेतीन लाखांहून अधिक मतांचे दान भरभरून टाकले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जवळपास सव्वादोन लाख मते मिळाली. काँग्रेस पक्षाची अतिशय दयनीय अवस्था असून त्या पक्षाला केवळ २४ हजार २६५ मते पडली.

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय- प्रादेशिकसह नोंदणीकृत मान्यताप्राप्त असे एकूण १८ राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार रिंगणात होते. भारतीय नवजीवन सेनेला सर्वांत कमी म्हणजे अवघी ४९ मते पडली आहेत. यंदाची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली, त्यामुळे प्रत्येक जागेसाठी किमान चार उमेदवार उभे होते.

आकडेवारीनुसार...
‘भाजप’ला एकूण ११ लाख ५३ हजार ६० मते पडली; परंतु प्रत्येक मतदाराने चार मते दिल्याचे गृहीत धरल्यास ‘भाजप’ला २ लाख ८८ हजार २६५ मते पडल्याचे स्पष्ट होत आहे. पालिकेच्या सत्तेमधून पायउतार झालेला राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी राहिला. ‘राष्ट्रवादी’ला ८ लाख ८८ हजार ६५९ म्हणजेच २ लाख २२ हजार १६४ मते पडली. 

शिवसेनेच्या उमेदवारांनी एकूण ५ लाख १६ हजार ७२१ म्हणजेच १ लाख २९ हजार १८० मतांसह तिसरा क्रमांक मिळविला. इतर प्रमुख आणि नवोदित राजकीय पक्षांची अवस्था अतिशय दयनीय राहिली. देशातील सर्वांत जुन्या काँग्रेस पक्षाला ९७ हजार ६३ म्हणजेच अवघी २४ हजार २६५ मते मिळाली. विशेष म्हणजे, काँग्रेसपेक्षा अपक्ष उमेदवारांना जास्त म्हणजे एकूण मिळून २ लाख ६७ हजार २२९ मते खेचण्यात यश मिळाले आहे.  

पक्षनिहाय मते... (१:४ याप्रमाणे)
राजकीय पक्ष         मिळालेली मते

भारतीय जनता पक्ष    ११,५३,०६० 
राष्ट्रवादी काँग्रेस    ८,८८,६५९
शिवसेना    ५,१६,७२१
मनसे    ४२, ९९०
काँग्रेस     ९७,०६३
बसप     २०,९९५
एमआयएम    १८,८५८
भारिप बहुजन महासंघ    ३५९५
शेतकरी कामगार पक्ष    ५१५
जनता दल (धर्मनिरपेक्ष)    २७५
समाजवादी पक्ष    १८७७
भारतीय नवजवान सेना    १९६
राष्ट्रीय समाज पक्ष     ९६५
रिपब्लिकन पक्ष (आठवले गट)    ३३५३
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष    १०३३
अपक्ष    २,६७,२२९

Web Title: voting to bjp