
Pune Municipal Corporation election
Sakal
पुणे - सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश दिल्यानंतर आता प्रत्यक्ष मतदान कधी होणार याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. पुणे महापालिकेसाठी जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे २३ जानेवारीपूर्वी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्याच्या किमान दीड महिना आधी निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे.