पुणे - पुणे शहर भाजपचा नवीन शहराध्यक्ष निवडण्यासाठी उद्या (ता. २७) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. यामध्ये प्रदेशाकडून पाठविण्यात आलेले पर्यवेक्षक आणि निरीक्षक यांच्यापुढे प्रत्येक पदाधिकाऱ्याला शहराध्यक्षपदासाठी योग्य असलेल्या तिघांची नावे सांगावी लागणार आहे. यामध्ये एक नाव महिलेचे असणे बंधनकारक आहे. यामुळे भाजपमधील इच्छुकांनी त्यांच्या नावाचा प्रभाव पाडण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.