व्हीव्हीपॅट मशिन बाजूला ठेवले; मात्र दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेतल्याचे येथील मतमोजणी ठप्प झाली होती. मतमोजणीनंतर ईव्हीएम मशिन सील करावे लागते. त्याच्यावर मतदान अधिकाऱ्याची सही घ्यावी लागते.

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेतल्याचे येथील मतमोजणी ठप्प झाली होती. मतमोजणीनंतर ईव्हीएम मशिन सील करावे लागते. त्याच्यावर मतदान अधिकाऱ्याची सही घ्यावी लागते. मात्र, त्यावर त्यांची सही नव्हती. त्यामुळे हे व्हीव्हीपॅट मशिन बाजूला ठेवले आहे. असे असले तरी दुसरी फेरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, पहिल्या फेरीमध्ये गिरीश बापट यांना 21 हजार 896 तर मोहन जोशी यांना 14124 एवढी मते मिळाली. यामध्ये बापट हे पहिल्या फेरीमध्ये 15 हजार 772 मतांच्या आघाडीवर आहेत. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच प्रत्येकाच्या घरांमध्ये टीव्ही सुरू झाल्याचे चित्र दिसत होते. त्याचप्रमाणे टीव्हीवर "ब्रेकिंग न्यूज'चा धडाकाही ऐकू येत आहे. हेच चित्र रस्त्यांवरील हॉटेल्स, दुकानांमध्ये दिसत होते. अनेकजण रस्त्यावर उभे राहून तर काहीजण चहा व नाश्‍त्याचा आस्वाद घेत मतमोजणीच्या घडामोडींचा आढावा घेताना दिसत आहेत. मतमोजणी परिसरात युती व आघाडीच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. तसेच, प्रत्येकाचे मोबाईल फोन मिनटा-मिनीटाला खणखणत असून कोण आघाडीवर?, अशाच स्वरूपाचे फोन त्यांना येत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VVP machine left aside and second round process started in pune