वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ
वडगाव निंबाळकर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे लगत सात ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली. घरांना बाहेरून कड्या लाउन चोरी केली. शनिवार ता. १२ पहाटे एक पासुन, सुमारे दोन तास हा प्रकार सुरु होता. स्वसंरक्षणासाठी गोळीबार करूनही शेजारचे घर फोडले. भालदार कुटुंबातील व्यक्तींनी प्रतिकार करत पाठलाग केल्याने चोरट्यांनी पोलिस ठाणेच्या दारातून पळ काढला.
वडगाव निंबाळकर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे लगत सात ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली. घरांना बाहेरून कड्या लाउन चोरी केली. शनिवार ता. १२ पहाटे एक पासुन, सुमारे दोन तास हा प्रकार सुरु होता. स्वसंरक्षणासाठी गोळीबार करूनही शेजारचे घर फोडले. भालदार कुटुंबातील व्यक्तींनी प्रतिकार करत पाठलाग केल्याने चोरट्यांनी पोलिस ठाणेच्या दारातून पळ काढला.
नीरा बारामती मार्गलगतची घरे चोरट्यांनी लक्ष केली होती. सुरूवातील सदोबाचीवाडी गावच्या हद्दीतील सणस वाड्यात चोरटे शिरले. पंधरा खोल्यांना बाहेरून कड्या लावल्या. आरडा ओरडा करूनही चोर जात नव्हते. सुधीर सणस माडीवर गेले. येथुन हवेत बुंदुकीतून गोळीबार केल्यावर चोरटे गेले. शेजारील अभिजित मनोहर फराटे यांचे घर फोडले. बाजुच्या खोल्यांना बाहेरून कडी लाउन बंद खोलीचे कुलुप तोडुन साड्यांसह बारा हजारांचा ऐवज नेला.
सुदाम खंडेराव फराटे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला पण काहीच मिळाले नाही. वसंत होळकर यांच्या घराचे कुलुप तोडुन कपाटातील साड्या तीन हजार रोख रक्कम नेली. इतर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे. पण ऐवज गेला नसल्याने पुढे कोणी आले नाही. शिवाजी देवकर यांच्या सलुन दुकानचे कुलुप तोडले येथे काही मिळाले नाही. लगतचे महंम्मद दिलावर भालदार यांचे जनरल स्टोअर दुकान उघडुन आत गेले. यावेळी भालदार कुटुंब जागे झाले. महम्मंद पत्नीसह बाहेर आले आरडा ओरडा केल्याने मुलगा फिरोज आणि आदम यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.
पोलिस ठाण्याच्या दारातून चोरटे आंधारात पळाले. पाठलाग केल्याने चोरट्यांनी चोरलेला गल्ला जागीच टाकला. दरम्यानच्या काळात पोलिस ठाण्यामधे फोन लाउनही फोन लागला नाही. जमलेल्या नागरीकांनी ठाणे अंमलदारांना उठवून घडला प्रकार सांगीतला. सावधा झोपा असा सल्ला देउन ठाणे अंमलदारांनी नागरीकांचे सांत्वन केले. पोलिस ठाणे परिसरातच चोरट्यांचा दोन तास धुमाकुळ सुरु होता. बंटी सणस यांनी शंबर नंबरला फोन लाउनही प्रतिसाद आला नाही.
स्थानिक पोलिसांनी तत्परता दाखवली नाही. दुपारी बारा पर्यंत चोरी झालेल्या ठिकाणी भेटीसुद्धा दिल्या नसल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला. याबाबत सहाय्यक पोलिस निरिक्षक समाधान चवरे यांच्याशी संपर्क साधला असता माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही. चोरीची तक्रार एकत्र घेतली जाईल असे त्यांनी सांगीतले