Loksabha 2019 : वडगाव शेरीचा कौल ठरणार महत्त्वाचा 

Loksabha 2019 :  वडगाव शेरीचा कौल ठरणार महत्त्वाचा 

पुणे - गरीब, श्रीमंत, उच्चशिक्षित, कष्टकरी समाज, विविध जातीधर्मांचे नागरिक अशा कॉस्मोपोलिटीन वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात लोकसभेची रंगत वाढली आहे. या भागातून ज्या उमेदवारास मतदार कौल देणार, त्याचा विजय सुकर होणार आहे. 

पुणे लोकसभा मतदारसंघात सर्वांत जास्त 4 लाख 44 हजार 252 मतदार वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यापैकी 2 लाख 6 हजार 181 इतके मतदान झाले आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला वडगाव शेरीने 42 हजार 404चे मताधिक्‍य दिले होते. त्यानंतर विधानसभेला प्रथमच भाजपचा आमदार येथून निवडून आला. 2017च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे14, शिवसेनेचे 3 नगरसेवक निवडून आले; तर "राष्ट्रवादी'चा बालेकिल्ला म्हणवला जात असताना त्यांचे फक्त "राष्ट्रवादी"चे 6 नगरसेवक महापालिकेत गेले. या मतदारसंघात 30 टक्के झोपडपट्टी, तर 70 टक्के सोसायट्या आहेत. गावठाणांमधील मतदारांची संख्या मोठी असल्याने त्याचाही फरक मतदानावर पडतो. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत वडगाव शेरीतून भाजपला 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांची संख्या 94 आहे. या भागातून आपल्याला मताधिक्‍य मिळावे, यासाठी कॉंग्रेसने फिल्डिंग लावली होती; तर भाजपनेही मताधिक्‍य राखण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. 2014ला वडगाव शेरीमध्ये 1 लाख 89 हजार 629 म्हणजेच 49.80 टक्के मतदान झाले होते; तर 2019ला 2 लाख 6 हजार 181 इतके मतदान झाले असून, याची टक्केवारी 46.41 टक्के इतकी आहे. मतदानाचा टक्‍का घसरला असला, तरी गेल्या वेळेपेक्षा यंदा 16 हजार 552 इतके मतदान जास्त झाले. पुणे शहरात सर्वाधिक मतदान या भागात झाल्याने येथून ज्या उमेदवाराला मताधिक्‍य मिळणार त्याचा विजय सोपा होणार, हे निश्‍चित. 

भाजपची परीक्षा 
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांची युती झाली, तर वडगाव शेरी मतदारसंघ हा शिवसेनेकडे जाईल, अशी चर्चा सध्या आहे. त्यामुळे या भागात लोकसभेला भाजपला किती मताधिक्‍य मिळणार, यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून असल्याने ही लोकसभा भाजपसाठी परीक्षाच ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com