

Wadivale Dam Near Full Capacity; Authorities Warn Residents Along Indrayani River
esakal
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील वडीवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी (६ जुलै) सकाळी ११ वाजेपर्यंत धरण ८९.४० टक्के भरले असून, पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरील दरवाज्यांद्वारे नदीपात्रात ५,९२५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.