

Pune
esakal
रवींद्र पाटे
नारायणगाव: वडज धारणातून मीना नदी पात्रात आठरा हजार कुसेक्सने पाणी सोडल्याने मीना नदीला पूर आला असून नदीतून धोक्याच्या पातळीवरून पाणी वाहत आहे. वडज ते नारायणगाव दरम्यानचे मिना नदीवरील व कोल्हापूर बंधाऱ्यावर असलेले पुल पाण्याखाली गेल्याने दळणवळण ठप्प झाले आहे.वारुळवाडी येथे मीना नदीच्या काठावर झोपड्या बांधून राहणाऱ्या कातकरी आदिवासी समाजातील लहान मुलांसह एकोणीस नागरिकांना नारायणगाव पोलिस, महसूल विभाग व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवल्याने मोठी दुर्घटना टळली.