

Truck Parked Without Safety Lights Causes Fatal Crash
sakal
वाघोली : थांबलेल्या ट्रकला दुचाकीस्वराची धडक बसली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. वाघोलीतील कटकेवाडी परिसरात ही घटना घडली. रणजित छोटन मिश्रा (३५, रा. वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार अशोक माने यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रामू रामकिशोर वर्मा (रा. उत्तरप्रदेश) या ट्रक चालकावर व दुचाकीस्वराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.