Wagholi Crime : भर रस्त्यावर स्कूल व्हॅन चालकावर कोयत्याने हल्याचा प्रयत्न; दोन मुलीसह आठ मुले व्हॅनमध्ये असताना हल्ला

स्कूल व्हॅन चालकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करण्याचा केला प्रयत्न.
School Van
School VanSakal

वाघोली - व्हॅन मालकासोबत न्यायालयात गेला. याचा राग मनात धरून स्कूल व्हॅन चालकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्हॅन मध्ये आठ विद्यार्थी होते. व्हॅनच्या काचा फुटण्याव्यतिरिक्त सुदैवाने कोणाही जखमी झाले नाही. ही घटना सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाघोली बकोरी फाट्यावर बीजेएस विद्यालयाजवळ घडली.

सचिन दिगंबर इंगोले (वय २७, रा. काळूबाई नगर, वाघोली) असे हल्याचा प्रयत्न झालेल्या व्हॅन चालकाचे नाव आहे. या प्रकरणी त्याने फिर्याद दिली असून हल्ला करणाऱ्या अल्पवयीन तरुणासह आकाश तोरंभे (रा. वाघोली) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन कदम हा व्हॅन मालक आहे. त्याच्याकडे इंगोले हा चालक म्हणून काम करतो.

कदम यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची सहा फेब्रुवारी २०२४ रोजी न्यायालयात तारीख होती. इंगोले हा कदम याच्या सोबत न्यायालयात गेला होता. न्यायालयात का गेला याचा राग मनात धरून त्याने मित्राच्या सहाय्याने स्कूल मधून व्हॅन निघाल्यानंतर चालकावर कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. व्हॅनची पुढील व चालकाच्या बाजूची काच या हल्यात फुटली. पुढे बसलेल्या विद्यार्थ्याला ही काच लागून तो किरकोळ जखमी झाला.

या प्रकाराने घाबरलेले विद्यार्थ्यांनी आरडा ओरडा केला. यानंतर  हे हल्लेखोर पळून गेले. या प्रकाराने व्हॅन मधील विद्यार्थी घाबरले. ही घटना कळताच पालक शाळेत पोहचले व मुलाना घरी नेले. भर रोडवर हा हल्याचा प्रकार घडला. व्हॅन मध्ये असणारी मुले ५ वी ते ९ वी वर्गातील होती. यामध्ये दोन मुलींचाही समावेश होता. या घटनेने पालक वर्गातही चिंतेची बाब पसरली.

मुले व्हॅन मध्ये असताना असा गंभीर प्रकार होणे चिंतेची बाब आहे. मुलांची सुरक्षितता कोणाच्या भरोशावर ठेवायची. दैव बलवत्तर म्हणून एकाही मुलाला लागले नाही. मात्र या घटनेने ते भेदरले.

- एक पालक

पोलिसांनी गांभीर्याने घ्यावे

भर रस्त्यावर, भर सकाळी, गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे हल्ले होणे गंभीर बाब आहे. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेवून असे हल्ले या पुढे होणार नाही यासाठी अत्यंत कडक कारवाई करायला पाहिजे. अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली.

स्कूल वाहनांची तपासणी होणे गरजेचे

वाघोली व परिसरात ६० पेक्षा अधिक स्कूल आहेत. त्यासाठी शेकडो बस, रिक्षा, व्हॅन विद्यार्थ्यांची ने आण करतात. मात्र ही सर्व वाहने परवाना घेवून अधिकृत आहेत की नाही. चालक कोण व कसे आहेत. याची पाहणी कोणीही करीत नाही. आरटीओ वाहतुक पोलीस यांनी अधून मधून तपासणी करायला पाहिजे. असा सूर नागरिकांतून ऐकायला मिळाला.

पालक चिंतेत

काही महिन्यांपूर्वी वाघोली परिसरात एका स्कूलच्या बसचा अपघात झाला होता. यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले होते. हा अपघात भयंकर होता. यानंतर सोमवारी हल्याचा गंभीर प्रकार घडला. असा प्रकाराने मुले भेदरत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने पालक चिंतेत पडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com