Wagholi News : चुकलेली मुलगी काही वेळातच पुन्हा वडिलांच्या कुशीत

वाघोलीतील केसनंद फाटा येथून खाजगी ट्रॅव्हल्स बसने अकोला येथे जाण्यासाठी निघालेल्या बाप लेकीची ताटातूट झाली.
wagholi traffic police
wagholi traffic policesakal

वाघोली - वाघोलीतील केसनंद फाटा येथून खाजगी ट्रॅव्हल्स बसने अकोला येथे जाण्यासाठी निघालेल्या बाप लेकीची ताटातूट झाली. लोणीकंद वाहतूक पोलीसांनी तात्काळ तिच्या वडिलांचा शोध घेऊन तिला त्यांच्या स्वाधीन केले. ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश उमाळे हे आपली पाच वर्षीय मुलगी मनस्वी हिला घेवून अकोला येथे निघाले होते. ते कोरेगाव पार्क येथून बसने जाण्यासाठी वाघोली केसनंद फाटा येथे आले. तेथे बसची वाट पाहत होते. मुलीला पाणीपुरी आणण्यासाठी तेथून ते दुसरीकडे गेले. वडील दिसले नाही म्हणून मनस्वी घाबरली. ती रडत रडत चौकात आली.

तिला रडताना पाहून तेथे वाहतूक नियमन करीत असलेले लोणीकंद वाहतुक विभागाचे कर्मचारी स्वप्निल गालफाडे व सागर चौधरी यांनी तिला पाहिले. त्यांनी तिला जवळ घेतले. महिला कर्मचारी स्नेहल टकले यांनी तिलाला घेवून रडणे थांबविले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने तिचे नाव सांगितले. ही बाब लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांना कळाली.

त्यांनीही माहिती घेवून तात्काळ कर्मचाऱ्यांना तिच्या वडिलांना शोधण्यासाठी पाठविले. पोलीस जीप मधूनही अनाउन्समेंट करून तिच्या वडिलांना शोधण्यात आले. अखेर ते तिथेच फाट्यावर सापडले. वडील समोर असताना तिला पुन्हा तिचे नाव विचारून हे कोण अशी विचारणा करण्यात आली.

तिचेच वडील असल्याबाबत सर्व खात्री केल्यानंतर तिला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. वडिलांना पाहून ती ही गळ्यात पडली. यानंतर ते पुढील प्रवासासाठी निघाले. वडील व मुलगी यांची भेट घडवून आणल्याने वाहतूक पोलीस कर्मचारीही सुखावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com