दुचाकीद्वारे मोबाईल चार्जिंग उपकरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

वाघोली - जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील यासीर नवाझ या विद्यार्थ्याने धावत्या दुचाकीतील बॅटरीवर मोबाईल चार्ज करणारे उपकरण तयार केले आहे. हे उपकरण बाजारातील चिनी उपकरणापेक्षा स्वस्त व टिकाऊ असल्याचा दावा त्याने केला आहे. दोन ते पाच तासांत मोबाईलची बॅटरी चार्ज करण्याची क्षमता यामध्ये आहे.

यासीर इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲण्ड टेलिकम्युनिकेशच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्याच्या या उपकरणाला हैदराबाद येथील कंपनीने मान्यता देत ‘शॉट बाय रानाझ टेक’ या नावाने बाजारात आणले आहे. त्याच्या या संशोधनाबद्दल संकुल संचालक अजित टाटिया, प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर, विभाग प्रमुख मीनल बुचटे यांनी अभिनंदन केले. 

हे उपकरण तयार करताना तांत्रिक अडचणी आल्या. मात्र जिद्द न सोडता ते तयार करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर यश आले. वाजवी किंमत, कमी वजन, टिकाऊ असणारे उपकरण तयार व्हावे, यासाठी परिश्रम घेतले. बाजारातील चिनी उपकरणापेक्षा हे निश्‍चित स्वस्त व टिकाऊ आहे. 
- यासीर नवाझ.

Web Title: wagholi pune news mobile charging by two wheeler