पुण्यातील `हा` भाग होणार कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

तिसऱ्या रुग्णाला घरी सोडण्यात आले

वाघोली : वाघोलीतील चार कोरोना बाधित रुग्णांपैकी दोन जणांना गुरुवारी सायंकाळी घरी सोडण्यात आले होते. आज दुपारी तिसऱ्या रुग्णाला घरी सोडण्यात आले. चौथ्या रुग्णाचा पहिला चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून सायंकाळ पर्यंत दुसरा अहवाल अपेक्षित आहे. 

15 एप्रिल रोजी वाघोलीत पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर चार दिवसात तीन रुग्ण आढळून आले. या चारही रुग्णांच्या कुटुंबीयांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तर त्यांच्या संपर्कातील 21 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. तिघांवर खाजगी रुग्णालयात तर एका वर नायडू रुग्णालयात उपचार सुरू होते. चौघांचीही प्रकृती स्थिर होती.

आणखी वाचा- अभिमानास्पद ! बारामतीच्या सुपुत्राने राष्ट्रपती शौर्य पदका पाठोपाठ पटकाविले... 

21 जणांचा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तिसऱ्या रुग्णाचे दोन्ही वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दुपारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. वाघेश्वर मंदिर चौकात फुलांची उधळण करत व टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

ससून रुग्णालयाच्या परिचारिका प्रेरणा जामनकर यांना दोन आठवडे ससून रुग्णालयात कोविड 19 रुग्णांची सेवा केली. यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागले. शनिवारी त्या वाघोलीतील राहत्या ब्लीथ आयकॉन सोसायटी मध्ये परतल्यानंतर त्यांचेही टाळ्या, थाळया वाजवून स्वागत करण्यात आले. 

वाघोली आता कोरोना मुक्त 
चार रुग्णांपैकी तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. चौथ्याचा पहिला वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. दुसरा अहवाल आज सायंकाळ पर्यंत अपेक्षित आहे. तो निगेटिव्ह आल्यानंतर त्यालाही रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. यामुळे वाघोली कोरोना मुक्त होईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wagholi will be corona free