जिल्हाधिकारी म्हणतायेत, वाघोली लवकरच कोरोना मुक्त होईल पण...

naval kishor ram.jpg
naval kishor ram.jpg

वाघोली (पुणे) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याची गरज असून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. जिल्हाधिकारी राम यांनी वाघोली ग्रामपंचायत हॉलमध्ये पदाधिकारी व नागरिक यांच्याशी चर्चा केली. वाघोलीतील आढावा घेऊन सूचना केल्या.

यावेळी राम पुढे म्हणाले, जिल्हा प्रशासन व इतर सर्व समन्वयीन यंत्रणा हा प्रादुर्भाव रोखण्याकरीता चांगल्या प्रकारचे काम करीत आहेत. आपणही स्वयंशिस्त पाळल्यास प्रादुर्भाव रोखला जाईल. वाघोलीही लवकरच कोरोना मुक्त होईल. विलगीकरण प्रक्रीया काटेकोरपणे राबविली गेली पाहिजे. कोरोनाचे संकट लगेच संपणारे नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

पुणे शहर पूर्वपदावर येण्यासाठी सर्वोतोपरी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत करण्यात येत आहेत. नागरिकांनीही वैयक्तिकरित्या या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व इतर उपकरणांचा नियमितपणे वापर करावा. तसेच अनावश्यक होणारी गर्दी टाळावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. यावेळी राम यांनी कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील डॉक्टरांशी संवाद साधला. तसेच प्रतिबंधित भागाला भेट देऊन प्रशासनाला सूचना केल्या. 

यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच रोहिणी गोरे, ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गायकवाड व सदस्य, नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com