कामे पूर्ण असूनही विजेची प्रतीक्षा

कामे पूर्ण असूनही विजेची प्रतीक्षा

पुणे - वीज वितरण प्रणालीतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी इन्फ्रा-१ आणि २ नंतर महावितरणने शहरात हाती घेतलेल्या इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम (आयपीडीएस) योजनेतही कामचलाऊ कामे झाली असल्याची माहिती समोर आली आहे. एकट्या शिवाजीनगर विभागात या योजनेंतर्गत नऊ ठिकाणी लघुदाब वाहिन्या टाकल्या. मात्र त्याला वीज पुरवठाच जोडला नसल्याने वर्षापासून त्या तशाच पडून आहेत. त्यामुळे महावितरणने कोट्यवधी रुपये खर्च करूनही ही योजना कागदावरच राहिली आहे.

विजेची वाढती मागणी आणि अस्तित्वातील वीज वितरण प्रणाली सक्षम करण्यासाठी महावितरणकडून विविध योजना आणल्या जातात. यापूर्वी अशा प्रकारे काही हजार कोटी रुपयांची कामे इन्फ्रा योजनेत  केली. 

परंतु त्याचा फायदा शहराला काय झाला, त्याचा ऑडिट रिपोर्टच महावितरणने जाहीर केला नाही. असे असताना दीड वर्षापूर्वी महावितरणने अस्तित्वातील वीज वितरण प्रणाली सुधरविण्यासाठी आयपीडीएस ही योजना हाती घेतली. यात शहरात अतिउच्च आणि लघुदाब वाहिन्या अनेक किलोपर्यंत टाकल्या. परंतु, त्यांना वीजजोड देण्याचा विसर महावितरणला पडला  आहे. 

काम पूर्ण; पण वर्षापासून वीजजोड नाही
  मांगल्य ट्रान्सफॉर्मर लघुदाब वाहिनी - ५०० मीटर
  फॅयाड्रीक्‍सी ट्रान्सफॉर्मर लघुदाब वाहिनी - ५०० मीटर
  ५१२ ट्रान्सफॉर्मर लघुदाब वाहिनी - दोन किमी काम पूर्ण
  कॅंटोन्मेंट ऑफिस ट्रान्सफॉर्मर लघुदाब वाहिनी - ६०० मीटर
  टीडी ट्रान्सफॉर्मर लघुदाब वाहिनी - एक किलोमीटर
  ऑफिस नंबर २ ट्रान्सफॉर्मर लघुदाब वाहिनी - दीड किलोमीटर
  गणपती मंदिर ट्रान्सफॉर्मर लघुदाब वाहिनी - दोन किलोमीटर
  धोबी घाट ट्रान्सफॉर्मर लघुदाब वाहिनी - एक किलोमीटर
  किर्लोस्कर ते बोपोडी दीड किलोमीटरचे उच्चदाब वाहिनीचे काम अपूर्ण

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील लष्करी आस्थापनाच्या परिसरातील ही सर्व कामे आहेत. महावितरणने वीजवाहिन्या टाकल्या आहेत. परंतु, त्यातून वीजपुरवठाच सुरू केला नाही. त्यासाठी सुमारे ८० लाख ते एक कोटी रुपये खर्च झाला आहे. हा सर्व खर्च वाया गेला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
- विजय काळे, आमदार

कोणत्या योजनेंतर्गत ही कामे झाली, त्यांची माहिती घ्यावी लागणार आहे. जर आयपीडीएस योजनेंतर्गत ही कामे झाली असतील, तर संबंधितांकडून त्यांचे अहवाल मागविण्यात येतील.
- विजय भाटकर, अधीक्षक अभियंता, आयपीडीएस योजना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com