जुन्नरला तहानलेल्या गावांना टँकरची प्रतीक्षा 

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 4 मे 2018

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील 7 गावे व 77 वाड्या-वस्त्यांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली असताना तहानलेली गावे व वाड्यातील सुमारे 16 हजार 754 लोकवस्ती टँकरच्या प्रतीक्षेत आहे.

आदिवासी भागातील कोपरे, मुथाळणे, जळवंडी, अंजनावळे,आलमे तर पूर्व भागातील नळवणे व शिंदेवाडी अणे गावच्या वाड्यासह 77 वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. येथे पाणी पुरवठा करण्यासाठी पाच टँकर लागणार आहेत. टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. या गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्या आले आहेत. अद्याप टँकर मंजूरी मिळाली नसल्याने टँकर सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले.
 
Web Title: waiting for water tanker in junnar