पुणे : चोरी गेलेले केस परत मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

राजकुमार थोरात
Thursday, 17 December 2020

दीड वर्षापूर्वी लासुर्णे (ता. इंदापूर) येथे दुचाकीवरुन चालेल्या युवकाला अडवून ५० किलो डोक्याच्या केसांची चोरी झाल्याची घटना घडली होती.

वालचंदनगर : दीड वर्षापूर्वी लासुर्णे (ता. इंदापूर) येथे दुचाकीवरुन चालेल्या युवकाला अडवून ५० किलो डोक्याच्या केसांची चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील चोरी माला विकलेली १ लाख ९० हजार रुपयांची रोख  रक्कम व १२ किलो केस वालचंदनगर पोलिसांनी फिर्यादीला परत केले.

भेसळीचा संशय आल्याने तब्बल ९ लाखाचा तूप साठा जप्त   

इंदापूर तालुक्यातील शेळगाव मधील महेश सुभाष निंबाळकर हे गावोगावी फिरुन केसावरती भांडी विक्रीचा व्यवसाय करतात. ८ जुुलै २०१९ रोजी निंबाळकर हे इंदापूर-बारामती राज्यमार्गाने ५० किलो केस घेवून बारामतीकडे विक्रीसाठी चालले होते. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लासुर्णेजवळील चिखलीफाटा येथे अनोळखी चोरांनी निंबाळकर यांना दमदाटी व मारहाण करुन ५० किलो केस चोरुन नेले.

डॉक्‍टर तरुणाला ३० लाख १० हजारांचा ऑनलाइन घातला गंडा

या घटनेचा वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार व हवालदार प्रकाश माने यांनी तपास करुन गुन्हामध्ये  अनोळखी असलेल्या आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणी पोलिसांनी मयूर उर्फ जुल्या मोहन पाटोळे (रा. निमगाव केतकी), शंकर उमाजी बोडरे (रा. फोंडशिरस ता. माळशिरस), विजय मल्हारी जाधव (रा. धर्मपूरी, ता. माळशिरस), सुनिल उर्फ सोन्या तायाप्पा शिंदे व लक्ष्मण मारुती वाघमोडे (रा. दोघे, शेळगाव) यांना अटक करुन त्यांच्याकडून १२ किलो केस हस्तगत केले.

भेसळीचा संशय आल्याने तब्बल ९ लाखाचा तूप साठा जप्त   

तसेच केस विकून मिळावलेले १ लाख ९० रुपये रक्कमही पोलिसांनी हस्तगत करुन पोलिस ठाण्यात जमा केली. इंदापूर न्यायालयाने निंबाळकर यांना १ लाख ९० हजार व १२ किलो केस परत करण्याचे आदेश दिल्यानंतर वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार धोतरे, कारकून शदर तावरे यांनी निंबाळकर यांना रोख रक्कम व केस परत दिले असून निंबाळकर यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: walchandnagar police traced the unidentified accused