कोंढव्यात वाड्याची भिंत घरांवर कोसळली

अग्निशामक दलाच्या जवानांकडून ११ जणांना सुखरूप बाहेर काढले
wall of old castle collapsed on the houses In Kondhva pune
wall of old castle collapsed on the houses In Kondhva punesakal

पुणे : कोंढवा बुद्रुक गावठाणात एका वाड्याची भिंत गुरुवारी सकाळी शेजारील घरांवर कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून तीन घरांमधील ११ जणांची सुटका केली. कोंढवा बुद्रुक गावठाणामधील दत्त मंदिरासमोर एक वाडा आहे.

वाड्याशेजारीच नागरिकांची घरे आहेत. जोरदार पावसामुळे गुरुवारी पहाटेच्या सुमारास संबंधित वाड्याची भिंत बाजूच्या तीन घरावर पडली. दरम्यान, या घटनेची माहिती नागरिकांनी अग्निशामक दलाला दिली. त्यांनतर काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दगड, माती व चिखल बाजूला काढून आतमध्ये अडकलेल्या ११ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com