तुळशीबागेत शॉपिंग करायची? मग, आठवडाभर थांबा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

जरी तुळशीबाग सुरू झाली तरी दुकानांच्या आवारात येताना ग्राहक म्हणून तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे, उगाच दोधी-चौधी एकत्र येणं, मास्क न बांध, नेहमीप्रमाणे तासन् तास दुकानं पालथी घालून..हे मात्र तुम्हाला अजिबात करता येणार नाही. कारण, तुळशीबागेत व्यापाऱ्यांनी काळजी घेण्याचा निर्धार केला, त्यानंतर पुढच्या आवड्यात काही दुकाने उघडण्याच्या हालचालीही त्यांनी केला आहेत.

पुणे : पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावरच्या बाजारपेठेतली दानिगे, साड्या आणि ड्रेस मटेरिअलची दुकाने उघडलीत... मग, इथली तुळशीबाग कधी उघडणार ? याची उत्सुकता मुली-महिलांमध्ये असेल ? पण पुढचा आठवडाभर तरी तुळशीबाग सुरू होणार नाही. मात्र, येत्या २८ मेला काही दुकाने उघडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावर आला खरेदीसाठी आला तरी, तुळशीबागेतल्या 'शॉपिंग'साठी मात्र, वाट पाहावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जरी तुळशीबाग सुरू झाली तरी दुकानांच्या आवारात येताना ग्राहक म्हणून तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे, उगाच दोधी-चौधी एकत्र येणं, मास्क न बांध, नेहमीप्रमाणे तासन् तास दुकानं पालथी घालून..हे मात्र तुम्हाला अजिबात करता येणार नाही. कारण, तुळशीबागेत व्यापाऱ्यांनी काळजी घेण्याचा निर्धार केला, त्यानंतर पुढच्या आवड्यात काही दुकाने उघडण्याच्या हालचालीही त्यांनी केला आहेत. कोरोनाच्या धास्तीनंतर पुण्यातील सर्वच बाजारपेठांसोबत तुळशीबाग 'लॉक झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही बाजारपेठ आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात काही भागातील व्यवहार सुरू झाले आहे. दोन दिवसांपासून लक्ष्मी रस्त्यावर बाजार पेठ उघडली गेली. त्यामुळे या रस्त्यालगतच्या गणपती चौकाशेजारी तुळशीबागेतील दुकाने उघडणार, याची उत्सुकता आहे. मात्र, आणखी एका आठवडा दुकाने बंद राहणार आहेत.

- विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

कोरोनाच्या धास्तीने गेली दोन महिने 'शटरडाऊन' झालेल्या आणि नूर पालटलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील बाजारपेठ बुधवारी झळाळली ती सराफ दुकानांतले दागिने आणि त्यावरच्या दिव्यांनी...या रस्त्यावरच्या बहुतांशी सराफ व्यावसायिकांनी दुकाने उघडली; तर काही ठिकाणी कपड्यांची विशेषतः साड्यांची दुकाने सुरू झाली. परिणामी, शहरातील मुख्य बाजारपेठ अनेक दिवसांनी गजबजल्याचे चित्र होते. काही छोट्या दुकानदारांनीही व्यवसाय सुरू केला. त्याचवेळी लक्ष्मी रस्त्याच्या सदाशिव पेठ, नारायण पेठेतील सर्व सुरळीत झाल्याचे दिसून आले. टिळक रस्त्यावरची दुकाने मात्र बंद होती. तर त्यालगतचा शास्त्री रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ आहे. तेव्हा बुधवारी सकाळी लक्ष्मी रस्त्यावर व्यापारी आणि त्यांच्याकडील कामगारांची वर्दळी दिसून आली. दहा-साडेदहा वाजल्यापासून काही दुकानांचे शटर उघडण्यात आले . त्यात सर्वाधिक दुकाने ही सराफ व्यावसायिकांची होती. त्यामुळे गेल्या ५६ दिवसांपासून बंद राहिलेल्या येथील बाजारपेठ झळाळी मिळाल्याचे पाहायला मिळले.त्यानंतर अन्य काही दुकाने उघडतील, याची शक्यता होती. मात्र ती सुरू झाली नाही तरीही दुकानांभोवतीचे कामगारांची गर्दी होती. 

- आता महिलाही मशिदीत नमाज अदा करणार? सुप्रीम कोर्टाने केंद्रासह वक्फबोर्डाला पाठवली नोटीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: want do Shopping in Tulsi Baug Then wait for week