कार्यकर्त्यांची मजबूत फळी प्रचारात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

हडपसर - वानवडी प्रभाग २४ मधून निवडणूक लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून शांतिनगर भागात काढलेल्या पदयात्रेला तरुण मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांची मजबूत फळी हे महापौर प्रशांत जगताप यांच्या पॅनेलचे वैशिष्ट्य बनले. 

हडपसर - वानवडी प्रभाग २४ मधून निवडणूक लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून शांतिनगर भागात काढलेल्या पदयात्रेला तरुण मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांची मजबूत फळी हे महापौर प्रशांत जगताप यांच्या पॅनेलचे वैशिष्ट्य बनले. 

महापौर जगताप यांच्यासह पॅनेलमध्ये त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, कांचन जाधव, दिलीप जांभूळकर या प्रभागातून निवडणूक रिंगणात आहेत. महापौरांसह अन्य उमेदवारांचे सामाजिक कार्य, स्वच्छ प्रतिमा आणि पक्षाच्या माध्यमातून प्रभागात झालेल्या विकासकामांमुळे प्रचारादरम्यान मतदारांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चारही उमेदवारांनी एकत्रित प्रचाराची रणनीती आखली असून, रोज सकाळी व सायंकाळी मतदारांच्या भेटींवर भर दिला जात आहे.

महापौर म्हणाले, ‘‘गेल्या दहा वर्षांत शांतिनगर भागात पक्षाच्या माध्यमातून विद्युत तारा भूमिगत केल्या. मुख्य दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण केले, अंतर्गत १२ गल्ल्यांमध्ये सिमेंटचे रस्ते केले; तसेच रस्त्यांवर एलईडी दिवे बसविले आहेत. पिण्याच्या पाण्याची लाइन मोठ्या व्यासाची टाकण्याबरोबरच दिशादर्शक नामफलक बसविले आहेत. विकासकामांच्या जोरावर मोठ्या मताधिक्‍याने आमचे चारही उमेदवार निवडून येतील यात कोणतीही शंका नाही.’’

प्रचारयात्रेत ॲड. उल्हास धुमाळ, आर. डी. जाधव, जगन्नाथ पाटील, संजय खोरे, अशोक कांबळे, जनार्दन शेलार, रावसाहेब पाटील, निसारभाई शेख, विजय भिंगारदिवे, मिलिंद डिसोझा, संजय शेलार, राणी घोरपडे, शोभा शिंदे, माधवी पवार, वैशाली जाधव, मंगल शिंदे, भोला कनोजिया, संतोष परदेशी, सचिन फरांदे, कुंडलिक रोकडे, बाळासाहेब शितोळे, तांदळे काका, सुमन सुत्रावे, मिलिंद चव्हाण, बापू सोनवणे, रेखा खुडे, अनिल पंडित, सुरेश गायकवाड, राहुल जाधव, प्रशांत उरल्लापू, स्तातरभाई आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: wanwadi prabhag 24