

Panic Buying at Pune Petrol Pumps as Fuel Supply Chain Faces Disruptions
sakal
पुणे : युद्धामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा परिणाम शहरातील पेट्रोल पंपांवर अजूनही दिसत आहे. अनेक पेट्रोल पंपांना दिवसाला केवळ एकाच टँकरद्वारे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत असल्याने इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच कंपन्यांकडून पंपचालकांना एका दिवसाचेच क्रेडिट दिले जात असल्याने आर्थिक ताणही वाढला आहे.