खेड शिवापूरला फास्टॅग लेनसाठी वॉर्डन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

फास्टॅगधारक आणि फास्टॅग नसलेल्या वाहनांचे वर्गीकरण करण्यासाठी कायमस्वरूपी वॉर्डन नेमण्यात आले आहेत. तसेच जशी वाहनांची गर्दी वाढते तशा रोख मार्गिका वाढविण्यात येत आहेत.
- अमित भाटिया, व्यवस्थापक, पुणे-सातारा टोल रोड

खेड-शिवापूर - ‘सकाळ’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत खेड-शिवापूर टोल प्रशासनाने फास्टॅग यंत्रणा सुरुळीत होण्यासाठी सोमवारपासून उपाययोजना सुरू केल्या आहेत. फास्टॅगधारक आणि फास्टॅग नसलेल्या वाहनांचे वर्गीकरण करण्यासाठी कायमस्वरूपी वॉर्डन नेमण्यात आले आहेत. टोल नाक्‍यावर वाहनांची गर्दी वाढेल, त्यानुसार रोख टोलच्या मार्गिका वाढविण्यात येत आहेत. तसेच फास्टॅग वाहनांची संख्या वाढण्यासाठी फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल वसुलीची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खेड-शिवापूर टोल नाक्‍यावर कायमच वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. खेड-शिवापूर टोल नाक्‍यावरील ही वस्तुस्थिती ‘सकाळ’ने फास्टॅगची कोंडी या सदराखाली मांडली होती. 

पुणे : सोसायटीच्या अध्यक्षाला बेदम मारहाण; व्हिडिओ पाहून बसेल धक्का !

फास्टॅगधारक आणि फास्टॅग नसलेल्या वाहनांचे वर्गीकरण करण्यासाठी कायमस्वरूपी वॉर्डन नेमण्यात आले आहेत. तसेच जशी वाहनांची गर्दी वाढते तशा रोख मार्गिका वाढविण्यात येत आहेत.
- अमित भाटिया, व्यवस्थापक, पुणे-सातारा टोल रोड

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warden for the fastag lane to Khed Shivapur