esakal | नागरिकांच्या सतर्कतेमुळे वारजे-माळवाडीत 2 हरणांना जीवदान

बोलून बातमी शोधा

deer
नागरिकांच्या सतर्कतेमुळे 3 हरणांना जीवदान
sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

वारजे माळवाडी- deer lives भांबुर्डा (bhamurda) वन विभागाच्या हद्दीत सोमवारी वारजे माळवाडी (warje malwadi) येथे दोन आणि गोऱ्हे बुद्रुक येथे एक अशा तीन हरणांचे प्राण नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत. वारजे माळवाडी परिसरात आज दिवसभरात दोन हरणांना जीवदान मिळाल्याची घटना घडल्या आहेत. त्यातील पहिले हरीण रस्ता चुकल्याने नागरी वस्तीत आले होते. तर दुसरे जंगलात जखमी अवस्थेत आढळून आले. या दोघांच्यावर खासगी पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर तिसरी घटना गोऱ्हे बुद्रुक गावात एक चितळ हरीण गावात आले त्याच्या शिंगाजवळ जखमेतून रक्त येत होते. या तिन्ही घटनेत ग्रामस्थ व वन विभागाच्या मदतीने त्याचा जीव वाचला. (warje malwadi bhamurda Citizens vigilance saved three deer lives)

वारजे माळवाडी दुपारी दोन अडीच वाजण्याच्या सुमारास उन्हात गणपती माथा दिवंगत सोनेरी आमदार रमेश वांजळे ओपन जिम आहे. या परिसरात एक हरीण नागरी वस्तीत आल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या ठिकाणी एनडीएची संरक्षण भिंत आहे. त्या ठिकाणी रेस्क्यू टीम घटनास्थळी पोचली त्यांनी नागरी वस्ती परिसरातून त्याला घेऊन उपचारासाठी रेस्क्यू चॅरिटेबल रुग्णालयात नेले. तेथे त्याची पूर्ण तपासणी केली. ते घाबरलेल्या अवस्थेत होते. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.

हेही वाचा: पुणे विद्यापीठाला दुसऱ्या लाटेचा फटका, सहा जणांचा बळी

दुसरी घटना चांदणी चौक परिसरातील जंगलात आहे. संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वारजे येथील युवा कार्यकर्ते मनीष बराटे, महेश बराटे, दिनेश काळे, विकास पाटील येथील चांदणी चौक जंगलातील तळ्यात टॅंकरने पाणी टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना स्थानिक नागरिकांनी एक हरीण जखमी अवस्थेत असल्याचे सांगितले. त्यांनी या परिसरात शोध घेतला. एका खड्ड्यात हरीण पडलेले दिसले त्याच्या पायाला जखम असल्याने त्याला चालता येत नव्हते. महेश बराटे यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर खटके यांना या घटनेची माहिती दिली. तसेच वारजे येथील चांदणी चौकात असलेले वाहतूक विभागाचे अमोल सुतकर आणि अर्जुन थोरात यांना माहिती दिली.

वाहतूक विभाग व पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हरणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस त्याला वाहनातून चांदणी चौकातील वाहतूक पोलिस चौकीत घेऊन आले. थोरात यांनी रेस्क्यू टीमला याची माहिती दिली. रेस्क्यु टीमचे चैतन्य कुलकर्णी हे पोलिस चौकीतून रुग्णालय घेऊन गेले.

हेही वाचा: वारजे माळवाडी भागात वाढतीय रुग्णसंख्या; नवे चार हजार रुग्ण

गोऱ्हे बुद्रुक गावात जखमी हरणाला जीवदान

गोऱ्हे बुद्रुक गावात सोमवारी दुपारी संत धर्माजी महाराज मंदिराकडून गावात एक चितळ हरीण गावात आले त्याच्या शिंगाजवळ जखम झाली होती. रक्त येत होते. ग्रामस्थ व वन विभागाच्या मदतीने त्याचा जीव वाचला. भटक्या कुत्री त्याच्या मागे लागल्याने ते जखमी झाले होते. कुत्र्यांच्या तावडीतून जीव वाचविण्यासाठी हरीण गावात आले. कुत्री मागे असल्याने घाबरलेले हरीण गावात जागा मिळेल तिकडे ते पळते. नागरिक त्याला पाहण्यास बाहेर आले. त्यांनी कुत्र्यांना हाकलले. गावातील पानशेत रस्त्यालगत असलेल्या शांताई मंगल कार्यालयात हरीण गेले. ही बाब सरपंच लहू खिरीड, युवासेना जिल्हाप्रमुख सचिन पासलकर, ग्रामपंचायत सदस्य दशरथ खिरीड, शिवसेना शाखा प्रमुख संदीप खिरीड, चैतन्य हॉटेलचे मालक चैतन्य जोरी यांना समजली त्यांनी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले. या हरणास सुरक्षित ठिकाणी ठेवले. लगेच वन विभागच्या संतोषी अर्जुन यांच्याशी संपर्क केला. त्या गावात आल्यावर हरणाला त्यांच्या ताब्यात दिले.