Warkari Convention : राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने शनिवारी आळंदीत वारकरी अधिवेशन

राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने शनिवारी (ता.९) आळंदी येथे वारकरी अधिवेशन आयोजित केले आहे.
warkari
warkarisakal

पुणे - राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने शनिवारी (ता.९) आळंदी येथे वारकरी अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनामध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवरील प्रवचनकार सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवचनकार तुणतुणे महाराज यांनी यासंबंधी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक पराग गोखले, बापू महाराज रावकर, रामचंद्र महाराज पेनोरे उपस्थित होते.

आळंदी येथील देविदास धर्मशाळा येथे शनिवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत हे अधिवेशन होईल. त्यामध्ये अमृताश्रम स्वामी महाराज, विश्‍व हिंदू परिषदेचे मठाधिपती भास्करगिरी महाराज, प्रवचनकार ज्ञानेश्‍वर महाराज हडपे, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवचनकार भागवताचार्य केशव महाराज, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर देवस्थान संस्थेचे प्रकाश महाराज जवंजाळ आदी सहभागी होणार आहेत.

यावेळी ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन यांचे "राष्ट्रीय सुरक्षा आणि आव्हाने' व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे "राष्ट्रासमोरील संकटे' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com