गल्लाभरू कीर्तनकारांना आचारसंहितेचा चाप

PNE1
PNE1

आळंदीत येत्या रविवारी वारकरी संप्रदायाची परिषद

आळंदी (पुणे)  :  वारकरी संप्रदायाच्या परंपरेला छेद देत राज्यात अनेक जण गल्ला भरण्याच्या उद्देशाने कीर्तन-प्रवचन करतात. अशांना चाप लावण्यासाठी आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी राज्यातील ज्येष्ठ कीर्तनकार एकत्रित येऊन आचारसंहिता बनविणार आहेत. त्यासाठी आळंदीत कार्तिक वद्य द्वादशीला रविवारी (ता. 24) सकाळी साडेदहाला वारकरी कीर्तनकार आचारसंहिता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

आम्ही वारकरी संस्थेच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ चोपदार यांनी दिली.

वारकरी कीर्तन परंपरेचे शुद्ध स्वरूप अबाधित राहावे, या उद्देशाने आणि धंदेवाईक कीर्तनकारांना वैयक्तिक समज देण्याचा प्रयत्न करावा, यासाठी वारकरी संप्रदायातील निष्ठावंतांनी एकत्रित येऊन बाजारू आणि गल्लाभरू कीर्तनकारांवर चाप लावावा, असा या परिषदेचा उद्देश आहे.

परिषदेसाठी मारोती महाराज कुऱ्हेकर, केशव महाराज नामदास, विठ्ठल महाराज वासकर, बाळासाहेब मोरे, बंडातात्या कराडकर, चैतन्य महाराज देगलूरकर, रामभाऊ महाराज राऊत, संदीपान शिंदे, योगिराज गोसावी, जयवंत बोधले, राम झिंजुर्के, ज्ञानेश्वर कदम, श्रीकांत पातकर, सोपान सानप, संजय धोंडगे, उमेश दशरथे, अच्युत दस्तापूरकर ही वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित असणार आहेत. परिषदेत होणाऱ्या परिसंवादातून लिखित स्वरूपात आचारसंहिता प्रकाशित केली जाणार असल्याचे चोपदार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com