खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला; सावधानतेचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

- खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सोमवारी दिवसभरात अर्धा अब्ज घनफुटने (टीएमसी) वाढ झाली.
- खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सायंकाळी सहा वाजता मुठा नदीत पाच हजार 136 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे​
- रात्री उशिरा त्यात आणखी वाढ करण्याची शक्‍यता असून, नदी किनाऱ्यालगतच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

पुणे : खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सोमवारी दिवसभरात अर्धा अब्ज घनफुटने (टीएमसी) वाढ झाली.

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सायंकाळी सहा वाजता मुठा नदीत पाच हजार 136 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. रात्री उशिरा त्यात आणखी वाढ करण्याची शक्‍यता असून, नदी किनाऱ्यालगतच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गेल्या दहा दिवसांपासून टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे येवा वाढला असून, शनिवारी सायंकाळपर्यंत खडकवासला प्रकल्पातील एकूण पाणीसाठा 18.11 टीएमसी होता. तो सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 20.97 टीएमसी (71.93 टक्‍के) इतका झाला. म्हणजेच गेल्या दोन दिवसांत पाणीसाठ्यात 2.86 टीएमसीने वाढ झाली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning alert due to Increased water discharge from the khadakwasla Dam