बुधवारी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
Rain
Rain

पुणे - मॉन्सूनच्या पावसाचा जोर सध्या कोकणात वाढताना दिसून येत आहे. ही स्थिती अशीच कायम राहणार असून बुधवारी (ता. २८) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकण येथे ढगांची दाटी कायम आहे. उर्वरित राज्यात अंशत: ढगाळ हवामान असून पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी पडत आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे पुढील दोन दिवस पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूरच्या घाट माथ्यासह विदर्भातील बुलडाणा, अकोला, वशीम यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

सध्या उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यालगत असलेले अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र निवळले आहे. या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रापासून उत्तर केरळपर्यंत पश्चिम किनाऱ्याला समांतर असलेल्या कमी दाब पट्टा सक्रिय आहे. दरम्यान राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

मॉन्सूनची प्रगती

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीसाठी वातावरण अनुकूल झाले आहे. सोमवारी (ता. २७) मॉन्‍सूनने अरबी समुद्र आणि गुजरातच्या बऱ्याच भागात प्रगती केली होती. तब्बल अकरा दिवसांच्या विश्रांतीनंतर मॉन्‍सूनची प्रगती पुन्हा सुरू झाली. अरबी समुद्र आणि गुजरातच्या उर्वरित भागांमध्ये मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल राहील. तसेच बुधवारी (ता. २९) उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार आदी राज्यांच्या काही भागांमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन दिवसांत मॉन्सूनची वाटचाल अशीच कायम राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.

येथे जोरदार पावसाची शक्यता

रायगड, ठाणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

राज्यात झालेला पाऊस (मिलिमीटर मध्ये)

पुणे : ०.२

नगर : ३३

कोल्हापूर : ०.२

महाबळेश्वर : २

नाशिक : ६

मुंबई : ५

सांताक्रूझ : १२

रत्नागिरी : ४

डहाणू : १८

औरंगाबाद : ०.१

परभणी : ०.२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com