esakal | पावासाचे धुमशान, बारामतीसह चार तालुक्यांना सावधानतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

vir dam

नीरा नदी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वीर (ता. पुरंदर) धरणातून 33 हजार 168 क्यूसेक व वीजनिर्मिती प्रकल्पासाठी 8०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले ​

पावासाचे धुमशान, बारामतीसह चार तालुक्यांना सावधानतेचा इशारा

sakal_logo
By
संतोष जंगम

परिंचे (पुणे) : नीरा नदी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वीर (ता. पुरंदर) धरणातून 33 हजार 168 क्यूसेक व वीजनिर्मिती प्रकल्पासाठी 8०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले असल्याचे सहायक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून आणखी विसर्ग वाढवण्यात येणार असून, वीर मार्गे सातारा जिल्ह्याशी होणारा संपर्क तुटणार आहे. 

अरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात 

नीरा धरणाचे तीन दरवाजे गुरुवारी (ता. १३) दुपारी दोन वाजता चार फुटांनी उचलून नीरा नदी पात्रात १४ हजार ६७२ क्यूसेक पाणी सोडण्यात आले. नीरा नदी वरील धरण साखळी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू असून, वीर धरणात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे संध्याकाळी पाच वाजता वीर धरणाचे पाच दरवाजे चार फुटांनी उचलून २३ हजार १२० विसर्गात वाढ करण्यात आली. त्यानंतर साडेसात वाजता सात दरवाजे चार फुटांनी उचलून 33 हजार 168 क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. 

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव

गुंजवणी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, वेळवंडी व कानंदी नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी नीरा नदीपात्रात येत आहे. तसेच, इतर ओढ्यांचे पाणी नदीपात्रात येत असून, धरणात २५ हजार क्यूसेक आवक सुरू आहे. वीर धरणात ९८०१ एमटीएफसी पाणीसाठा असून, धरणाची पाणी पातळी ५७९.८२ मीटर आहे. धरणाचे दोन्ही कालवे बंद आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून आणखी विसर्ग वाढवण्यात येणार असून, वीर मार्गे सातारा जिल्ह्याशी होणारा संपर्क तुटणार आहे. याबाबत पुरंदर, बारामती, इंदापूर, खंडाळा, फलटण तालुक्यातील तहसीलदार व पोलिस यंत्रणेला सावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले. या वेळी संभाजी शेडगे, अरुण भोसले, लक्ष्मण भंडलकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

वीर धरणाचे पाच दरवाजे चार फुटांनी उचलण्यात आले असून, नीरा नदी पात्रात एकूण २३ हजार ९२० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास रात्री केव्हाही विसर्गात वाढ करण्यात येणार असून, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 - लक्ष्मण सुद्रीक, शाखा अभियंता