पिंपरी : 'या' बहाद्दराने पोलिस वाहनांसाठी काय केले ते एकदा पाहाच...

police-van
police-van

मोशी : कोरोनाच्या या लढाईमध्ये सध्या पोलिस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. यामध्ये त्यांना शासनाने पुरविलेल्या सर्वच पोलिस वाहनांचा कोरोनाग्रस्त भागासह सर्वत्र सतत वापर करावा लागत आहे. मात्र वेळेअभावी ही वाहने निर्जंतुकीकरण करणे शक्य होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन भोसरीतील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सत्यम वाॅशिंग सेंटरचे संचालक अरुण कापसे यांनी आपले वाॅशिंग सेंटर पोलिस वाहने निर्जंतुकीकरण करुन देण्यासाठी मोफत खुले केले आहे.

कोरोना व्हायरसपासून असलेला धोका व वेळेअभावी वाहने निर्जंतुकीकरण करण्यास वेळ नसल्याने ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस प्रशासनाने त्यांचे आभार व्यक्त केले आहे. कोरोनाग्रस्त भागासह शहरामध्ये सर्वत्र फिरून जनतेचे संरक्षण  करण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र झटत आहे आहेत. प्रत्येक वेळी त्यांना आपल्या वाहनांचा उपयोग करावा लागत आहे. कोरोना व्हायरस हा डोळ्यांना न दिसणारा व संसंर्गजन्य असल्यामुळे तो केव्हाही व कोठूनही वाहनांच्या माध्यमातूनही आपल्या या वीरांवर हल्ला करू शकतो.

त्यामुळे या कोरोना वाँरियर्सच्या पोलीस व्हँन, पेट्रोलिंग व्हॅन, अधिकार्‍यांच्या मोटारी, कर्मचारी दुचाकी सुध्दा सुरक्षित ठेवावी लागते. मात्र वेळेअभावी हे काम करणे त्यांना अशक्य असल्याची अडचण उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अरूण कापसे यांनी ओळखले. पोलीसांची ही अडचण दूर करत सद्गुरु नगर भोसरी येथे स्वतःच्या मालकीचे असलेले सत्यम वाॅशिंग सेंटर ही वाहने निर्जंतुकीकरण करुन देण्यासाठी मोफत खुले केले.
ही बाब पोलीस प्रशासनाला कळावी त्यासाठी त्यांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आवाहन केल्यानंतर त्यांच्या या आवाहनाचा स्विकार करुन दोन दिवसांपासून त्यांच्या भोसरीतील सद्गुरुनगर येथील सत्यम वाॅशिंग सेंटरवर अनेक पोलीस वाहने निर्जंतुकीकरण करुन घेण्यासाठी पोलीसांची सर्व प्रकारची वाहने येत आहेत.  पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध वाहनांच्या मोटार शोरुमध्ये अरुण कापसे यांची अनेक वाॅशिंग सेंटर्स आहेत. आत्तापर्यंत त्यांनी पन्नासहून अधिक पोलीस वाहने स्वच्छ धुऊन सॅनिटराईझ व निर्जंतुकीकरण करुन दिली असून ते ही सेवा कोरोनाचा नायनाट होईपर्यंत देणार आहेत.  पोलीस विभागातील अनेक वरीष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या अनोख्या कामाचे दुरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून कौतुक करत आहेत.

कोरोनाच्या या महासंकटामध्ये पोलिस प्रशासन अत्यंत महत्त्वाचे काम करत आहे. हे पाहून आपलाही या कामामध्ये खारीचा वाटा असावा म्हणून मी हे कार्य करीत आहे. कोरोना हद्दपार होईपर्यंत मी ही सेवा पोलीस प्रशासनासाठी सुरु ठेवणार असून वाहने निर्जंतुकीकरण करुन घेण्यासाठी पोलीसांनी माझ्या 9822404000 या क्रमांकावर संपर्क साधावा.- अरुण कापसे, संचालक : सत्यम वाॅशिंग सेंटर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com