येथे नित्य जळतोय कचरा! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

केशवनगर - मुंढवा परिसरात मोकळी जागा दिसेल तिथे नागरिक कचरा टाकत आहेत. हा कचरा इतका अस्तावस्त होतो की, कचरा वेचणाऱ्यांचे कंबरडे मोडेल, अशी परिस्थिती होत आहे. नंतर या कचऱ्याची विल्हेवाट करायची म्हणून कर्मचारीच हा कचरा जाळत असल्याचे चित्र आहे. मुंढवा बसथांब्यामागील मोकळ्या जागेत नित्याने हा कचरा जाळला जात असल्याने परिसरातील नागरिकांना धुराचा व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. 

मुंढवा परिसरात हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्यावर तुलसी हॉलसमोरील जागेत कचरा टाकण्याच्या सवयीमुळे येथे कायमच कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते. स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी "येथे कचरा टाकु नये; अन्यथा दंड आकारला जाईल' अशा आशयाचा सूचना फलकही लावला आहे; परंतु त्या फलकाला न जुमानता नागरिक राजरोसपणे तेथे कचरा टाकत आहेत. असाच प्रकार हडपसर रेल्वे स्टेशन रस्ता परिसरात जाधव वस्तीवरील मोकळे मैदान, मुंढवा गावठाणातील मारुती मंदिरापाठीमागील जागा, नदीपात्रातील परिसर, बधे वस्ती, बसथांब्यामागील मोकळे मैदान अशा अनेक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. कर्मचारी हा कचरा उचलण्याऐवजी जाळतात. त्यामुळे परिसरात धुराचे लोटच्या लोट उठतात. परिणामी, बसथांब्यावरील प्रवासी व नागरिकांना याचा त्रास होतो. 

"जनवाणी' संस्थेतर्फे घरोघरी कचरा गोळा केला जातो. यासाठी कर्मचारी प्रत्येक घरातून दरमहा तीस रुपये घेतात. काही भागांत नित्याने ही सेवा पुरवली जाते. काही भागांत कर्मचारी व नागरिकांमध्ये पैशांवरून वाद होतात. यामुळे काही नागरिक स्वतःचा कचरा स्वतःच टाकतात; परंतु हा कचरा उघड्यावर टाकण्याचे प्रकार होत आहेत. हा कचरा जाळल्यामुळेच येथील ट्रान्सफार्मरला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. 

Web Title: waste to be burned workers