औंध - कचरा वर्गीकरणामुळे महाविद्यालयासह नागरीक त्रस्त

बाबा तारे
मंगळवार, 24 जुलै 2018

पुणे (औंध) : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या कचरा वर्गीकरण केंद्रातील घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा त्रास येथील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व परिसरातील नागरीकांना होत आहे.

पुणे (औंध) : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या कचरा वर्गीकरण केंद्रातील घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा त्रास येथील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व परिसरातील नागरीकांना होत आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने संस्थेच्या व ग्रामस्थांच्या भूखंडावर तात्पुरते कचरा वर्गीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. या वर्गीकरण केंद्रातील कचरा बराच वेळ जागेवर राहिल्याने व पाण्यात पसरल्याने  त्याची दुर्गंधी वा-यासह परिसरात व  महाविद्यालयात पसरते. यामुळे येथील नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता सर्वांनी बोलून दाखवली. कच-यासह येथे येणा-या गाड्या,कामगार यांच्या आवाजाचा त्रासही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकतांना होत आहे याबाबतही काही तरी ठोस पावले उचलून हे केंद्र हलवावे आसी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

अनियोजीत व अनियंत्रीत वर्गीकरणामुळे येथील कच-याच्या या दुर्गंधीने स्थानिक नागरीक व महाविद्यालयातील सर्वच जण त्रस्त झाले आहेत.हा त्रास केवळ आसपासच्या नागरीकांना किंवा विद्यार्थ्यांनाच नाहीतर ये जा करणा-या प्रत्येकाला होत आहे.प्रत्येकाला येथून जातांना नाक तोंड दाबूनच जावे लागते त्यामुळे हा त्रास कमी होणे गरजेचे असल्याचे सर्वांनीच सांगितले. यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाला कळवूनही यावर हवे तेवढे लक्ष दिले जात नसल्याची तक्रारही संस्थेच्या व नागरीकांच्या वतीने केली जात आहे.तरी येथील कचरा वर्गीकरण केंद्र हटवावे अशी मागणी स्थानिक नागरीक व रयत शिक्षण संस्थेच्या वतीने केली जात आहे.

Web Title: waste distribution harmful for college and citizens